दिल्लीत कोरोना नियंत्रणात; CM केजरीवालांनी चक्क BJP चे मानले आभार

दिल्लीत कोरोना नियंत्रणात; CM केजरीवालांनी चक्क BJP चे मानले आभार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे धन्यवाद मानले

  • Share this:

दिल्ली, 15 जुलै : दिल्लीत काही आठवड्यांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यावर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीत कोरोना साथीच्या विरोधात सुरू असलेल्या युद्धामध्ये भाजपच्या पाठिंब्याबद्दल  धन्यवाद दिले आहेत. भाजपबरोबरच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कॉंग्रेसचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, - दिल्लीत कोरोनावर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे.

सध्या दिल्लीत जवळपास 18600 कोरोनाची सक्रिय प्रकरणे आहेत. जूनमध्ये ज्याप्रकारे प्रकरणे वाढत होती, ते पाहता असा अंदाज वर्तविण्यात आला होता की दिल्लीत कोरोना प्रकरणाचा आकडा 2.15 लाखांपर्यंत पोहोचू शकेल.

ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या अंदाजानुसार दिल्लीत कोरोना अ‍ॅक्टिव केसेसची संख्या सुमारे 1 लाख 34 हजारापर्यंत पोहोचू शकते.  अशा परिस्थितीत दिल्लीत सुमारे 34 हजार बेडांची गरज भासू शकेल, परंतु दिल्ली आणि केंद्र सरकारने दीड महिने दिवस-रात्र परिश्रम घेतले आणि प्रकरणं वाढण्यास थांबविले.

आज दिल्लीत फक्त 4000 बेडची गरज आहे, तरीही आम्ही 15,000 बेड्स तयार केल्या आहेत. कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या मृतांचा संख्यासंदर्भात ते म्हणाले की, दिल्लीत मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात खाली आली आहे. जूनमध्ये 100 पेक्षा जास्त मृत्यू झाले होते, आता 30 ते 35 मृत्यू. त्यांनी सांगितले की मृत्यू टाळण्यासाठी, चाचणी वाढविण्यात आली आहे. जेणेकरुन रोगाचे त्वरित निदान व उपचार करता येईल.

हे वाचा-हीच आमची जमेची बाजू,सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर मराठा समाजाची पहिली प्रतिक्रिया

कोरोना रोखण्यासाठी ही तीन तत्त्वे महत्त्वाची

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मते दिल्लीने या संक्रमणावर मात करण्यासाठी तीन तत्त्वांवर काम केले आहे. पहिल्या तत्वानुसार ही लढाई एकट्यानेच लढली जाऊ शकत नाही. ते म्हणाले की, आज भाजपा, कॉंग्रेस सर्वांचे आभार मानू इच्छित आहेत, त्यांनी ज्या कमतरता दाखवल्या आहेत, त्यावर न रागावता आम्ही त्या चुका सुधारल्या आहेत.

एनएनजेपी रुग्णालयातील जितक्या चुका काढल्या त्यातील प्रत्येक चूक दुरुस्त करण्यात आली आहे. दुसरा सिद्धांत - ज्यांनी वाईट आणि चूक दाखविली त्यांचा राग आला नाही. तिसर्‍या तत्वानुसार आम्ही कधीही हार मानली नाही. आता दिल्ली मॉडेलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे. ते म्हणाले की दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती आता नियंत्रणात आहे. केंद्र सरकार भाजपा कॉंग्रेसने सर्वांनी आमचे समर्थन केले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.

Published by: Meenal Gangurde
First published: July 15, 2020, 4:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading