पलंगावरून पडला कोरोना रुग्ण, पण हॉस्पिटलच्या दुर्लक्षामुळे घडला भयंकर प्रकार

पलंगावरून पडला कोरोना रुग्ण, पण हॉस्पिटलच्या दुर्लक्षामुळे घडला भयंकर प्रकार

कोरोना रुग्णाकडे दुर्लक्ष झाल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. शासकीय रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण पलंगावरून पडल्यामुळे मृत्यू झाला आहे.

  • Share this:

तेलंगाना, 27 जुलै : कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना रुग्णाकडे दुर्लक्ष झाल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. शासकीय रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण पलंगावरून पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी जिल्हा रुग्णालयात झालेल्या या घटनेत 70 वर्षाच्या कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 22 जुलै रोजी कोरोना रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणाच्या करीमनगरमध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे. रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. रविवार रुग्णावर कोणाचं लक्ष नव्हत आणि अशात त्यांचा तोल गेला आणि ते बेडवरून खाली पडले त्यामुळे त्यांचा ऑक्सिजन सप्लाय बंद झाला. बराचवेळ ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पतीच्या मृत्यूनंतर 8 दिवसात पत्नीचा मृत्यू, मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार कोण?

संबंधित वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांनी आरोप केला आहे की, 70 वर्षीय वृद्ध व्यक्ती पलंगावरून खाली पडल्याची माहिती तात्काळ रुग्णालय व्यवस्थापनाला सांगण्यात आली होती. परंतु कोणीही वेळीच न आल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे रुग्णाला त्रास होत होता, पण रुग्णालयाकडून कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही. अखेर रुग्णाचा मृत्यू झाला.

लॉकडाऊनमध्ये भर दिवसा खुनाचा थरार, तिघांनी एका तरुणाची केली निर्घृण हत्या

या दरम्यान, इतर रुग्णांनी केलेल्या तक्रारीचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. ज्यामध्ये रुग्णालय प्रशासनाचं दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून आलं आहे. रुग्णालय प्रशासनानं हा अपघातात आपली चुकी असल्याचं मान्य केलं असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

भारतात स्वस्त झाला सगळ्यात प्रसिद्ध android स्मार्टफोन, काय आहे नवी किंमत

करीमनगरमध्ये रविवारी कोरोनाचे 51 नवीन रुग्ण आढळले. रविवारी तेलंगणामध्ये 1500 पेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. रविवारपर्यंत राज्यात एकूण रुग्णांची संख्या 54 हजारांच्या पुढे गेली असून त्यामध्ये 463 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 27, 2020, 2:40 PM IST

ताज्या बातम्या