कोरोनामुक्त बारामतीला धक्का, पुन्हा सापडला नवा रुग्ण!

कोरोनामुक्त बारामतीला धक्का, पुन्हा सापडला नवा रुग्ण!

आत्तापर्यंत बारामतीत एकूण दहा रुग्ण आढळले असून त्यातील सात शहरातील तर तीन ग्रामीण भागातील आहेत.

  • Share this:

बारामती, 13 मे : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत असली तरी काही जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाला आहे. बारामती जिल्ह्याही कोरोनामुक्त झाला होता परंतु, आता आणखी एक कोरोना रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.

बारामती शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. शहरात पुण्यातून आलेल्या महावितरण कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पुण्यात काम करून बारामतीत परतलेल्या  वायरमनला कोरोना  संसर्गाची लागण झाली आहे.

हेही वाचा - आणखी 31 देशातून भारतीयांना आणणार; मोदी सरकारचे वंदे मातरम मिशन दुसऱ्या टप्प्यात

हा रुग्ण तालुक्यातील माळेगावचा आहे. ही व्यक्ती व्यवसायाने वायरमन असून  पुण्यात नोकरीला आहे. त्यांचा एक सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हाय रिस्क कॉन्टॅक्ट तपासणीमध्ये याचीही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

त्यामुळे  माळेगाव येथील परीसर  सील करण्यात आला आहे. तसंच या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचीही चाचणी केली जाणार आहे.

आत्तापर्यंत बारामतीत एकूण दहा रुग्ण आढळले असून त्यातील सात शहरातील तर तीन ग्रामीण भागातील आहेत. मागील दोन दिवसांपासूनच बारामती पूर्वपदावर  आली. आता यावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 13, 2020, 9:10 AM IST

ताज्या बातम्या