VIDEO: रुग्णालयात 'दिल धडकाये' गाण्यावर तरुणांनी केला डान्स, पण आता होतोय पश्चाताप

VIDEO: रुग्णालयात 'दिल धडकाये' गाण्यावर तरुणांनी केला डान्स, पण आता होतोय पश्चाताप

बारामतीच्या कोविड सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रूग्णांचा थरार पाहायला मिळाला आहे.

  • Share this:

बारामती, 28 जुलै : बारामतीच्या कोविड सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रूग्णांचा थरार पाहायला मिळाला आहे. 'दिल धडकाये' या गान्यावर रुग्णालयात रूग्णांनी ठेका धरला आणि धमाल डान्स केला. पण डान्स त्यांना चांगलाच महागात पडला आहे. बारामतीच्या शासकीय सिल्व्हर ज्युबिली हॉस्पीटलमध्ये रूग्णांचा डांन्स सुरू होता. याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये ठेका धरणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि एका डॉक्टर रूग्णाचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात आहे. दरम्यान, या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याची दखल घेतली असुन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुण्यात एका रात्रीत वाढला कोरोनाचा मोठा आकडा, मुंबईलाही टाकलं मागे

तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे कोरोना रुग्णांनी हॉस्पीटलमध्ये डान्स केला. यामुळे इतर रुग्णांना त्रास झाला असून रुग्णालय डान्स करण्याची जागा नसल्याने रुग्णांवर कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या काळात अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. एकीकडे रुग्णालयात डान्स सुरू आहे तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये काही रुग्ण रुग्णालयातच फूटबॉलची मॅच खेळत असल्याचं समोर आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील एका कोविड केअर सेंटरमध्ये चक्क फुटबॉलची मॅच पाहायला मिळाली होती. ज्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्या सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण फुटबॉल खेळत होते. त्यांच्या या फुटबॉल मॅचचा व्हिडिओ संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल झाला होता.

Weather Alert: महाराष्ट्रात होणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला अलर्ट

पन्हाळा तालुक्यातील वाघबिळ इथल्या एकलव्य पब्लिक स्कुलमधील कोविड केअर सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता. या सेंटरमधील पोर्ले आणि कोतोली गावतील कोरोनाबाधित तरुण फुटबॉल मॅच खेळत होते. फुटबॉल मॅचचा व्हिडिओ व्हायरल होताच कोडोली पोलिसांनी फुटबॉल खेळणाऱ्या तरुणच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात लवकरच येणार नवा सातबारा, सुटसुटीत करण्यासाठी करणार तब्बल 11 बदल

पन्हाळा तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 180 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील आता 112 ऍक्टिव्ह रुग्णांना वाघबिळ येथील एकलव्य पब्लिक स्कुलमधील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. एकूण 112 रुग्णांमध्ये वृद्धांसह तरुण वयातील मुलांचा समावेश आहे. येथील बहुतांश रुग्णांना अद्याप कोणतीही लक्षणे आढळली नाही.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 28, 2020, 12:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या