मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

चश्मा वापरणाऱ्यांना मास्कचा होतो सर्वाधिक त्रास; काचेवरचा धूसरपणा घालवायला करा हे उपाय

चश्मा वापरणाऱ्यांना मास्कचा होतो सर्वाधिक त्रास; काचेवरचा धूसरपणा घालवायला करा हे उपाय

Corona mask

Corona mask

कोरोना संसर्गाच्यापार्श्वभूमीवर सर्वांना मास्क (wearing mask for coronavirus protection) वापरणं बंधनकारक आहे. मात्र तरीही सतत मास्क लावणं अडचणीचं होतं. विशषतः चश्मेवाल्या व्यक्तींना. त्यांच्यासाठी काही सोप्या आणि DIY युक्ती पाहा.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 8मार्च: कोरोना संसर्गाच्या (Corona) पार्श्वभूमीवर सर्वांना मास्क (Mask) वापरणं बंधनकारक आहे. घराबाहेर पडताना मोबाईल फोन आणि पैसे यांच्या इतकाच मास्क महत्त्वाचा आहे. मात्र तरीही सतत मास्क वापरायला त्रासदायक होतं. विशेषतः चश्मावाल्या लोकांना. चश्मा वापरतात त्यांना मास्क वापरणं काहीसं अडचणीचं जातं. कारण मास्क लावल्यानंतर श्वासाव्दारे बाहेर पडणारी हवा (Fogging) चष्म्याच्या काचांवर साठून दिसण्यास अडचणी येतात. आर्द्रता, घाम आणि श्वासोच्छवासामुळे चष्माच्या काचांवर बाष्प जमा होते आणि धुरकट दिसू लागते. जेव्हा चश्मा घातलेली  व्यक्ती मास्क लावते, तेव्हा श्वास घेताना गरम हवा काचेच्याया पृष्ठभागावर जमते आणि काचांवर ओला थर जमा होतो. या वाफेमुळे समोरचं धूसर दिसतं. स्पष्ट दिसण्यास अडचणी येतात. परंतु, अशा काही हॅक्स आहेत की ज्या आपले कोरोनापासून संरक्षण करू शकतात आणि मास्क वापरताना चश्म्याच्या (Eye Glasses) अनुषंगाने येणाऱ्या अडचणीही दूर करू शकतात, जाणून घेऊ या अशा झटपट स्मार्ट उपायांबाबत...

स्पेशल स्प्रेज

चश्म्यावर जमा होणारा धूरकट वाफेचा थर टाळण्यासाठी विशेष प्रकारचे स्प्रे उपलब्ध आहेत. हे अँटी–फॉग स्प्रे (Anti - Fog Spray) चश्म्यांच्या काचांवर फवारले असता मास्क लावल्यावर जमा होणाऱ्या धूरकट थरापासून संरक्षण होतं.

फिटेड मास्क

चेहऱ्यावर तसेच नाकाभोवती घट्ट बसणारा मास्क (Fitted Mask) शक्यतो वापरावा. जर आपला मास्क नाकाच्या खालच्या भागापर्यंत व्यवस्थित लावला गेला असेल तर श्वास घेताना हवा बाजूने बाहेर पडेल आणि चश्म्यावर वाफेचा थर जमा होणार नाही.

लिक्विड सोप

काचेवरील फॉगिंग या समस्येवर DIY सोल्युशन आहे बरं का! जे मास्क परिधान करतात, ते चश्म्यावर द्रवरूप साबणाचा (Liquid Soap) एक थेंब टाकून कपड्याच्या तुकड्याने व्यवस्थित पूसून चश्मा वापरू शकतात. यावेळी चश्म्यातून स्पष्ट दिसत आहे का तपासणं गरजेचं आहे. चश्म्यावरील साबणाचा एक थेंब फॉगिंगपासून संरक्षण करतो.

(हे पाहा:राज्यात कोरोनाचा प्रसार अचानक का वाढला? तज्ज्ञांच्या पथकानं सांगितलं कारण  )

टॅपिंग फेस मास्क

मास्कचा योग्य वापर होण्यासाठी आणि फॉगिंग टाळण्यासाठी हा देखील प्रभावी पर्याय आहे. तुम्ही नाकावर मास्क चिकटवण्यासाठी (Tapping Mask) वैद्यकीय टेपचा वापर करु शकता. याचा वापर केल्यानंतर हवा चष्म्याच्या काचांवर जमा होत नाही आणि तुम्हाला दिसण्यास अडचण येत नाही.

First published:

Tags: Coronavirus, Covid19