महाराष्ट्राच्या जवानाचा कोरोनामुळे मृत्यू, कुटुंबीयांनी VIDEO कॉलवर घेतला शेवटचा निरोप

महाराष्ट्राच्या जवानाचा कोरोनामुळे मृत्यू, कुटुंबीयांनी VIDEO कॉलवर घेतला शेवटचा निरोप

नागप्पा सोमन्ना म्हेत्रे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा निरोप लष्कराकडून देण्यात आला होता. त्यामुळे सर्व गावची मंडळी आणि कुटुंबीय हे मृतदेहाची वाट पाहत होते.

  • Share this:

सोलापूर, 27 जुलै : देशभरामध्ये सध्या कोरोनामुळे मोठं संकट आलं आहे. अनेकांनी कोरोनाच्या संसर्गामुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोनामुळे पोलीस, आरोग्य कर्मचारी, राजकारणी ते अनेक दिग्गजांपर्यंत कोरोना पोहोचला आहे. अशात लष्करातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हुलजंती गावचे जवान नागप्पा सोमन्ना म्हेत्रे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा निरोप लष्कराकडून देण्यात आला होता. त्यामुळे सर्व गावची मंडळी आणि कुटुंबीय हे मृतदेहाची वाट पाहत होते. पण त्यानंतर कानावर काळजाला घर करणारी बातमी मिळाली.

नागप्पाचा यांचा मृत्यू कोरोनाने झाला असल्याने त्यांच्यावर श्रीनगरमध्येच अंत्यसंस्कार होणार असल्याचा फोन आला आणि कुटुंबीयांच्या पायाखालची जमिन सरकली. आपल्या माणसाला शेवटचं पाहताही येणार नाही यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागप्पा हे श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावत होते. तिथे त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.

पिंपरीमध्ये 4 वर्षाच्या लेकीला आईने जमिनीवर आपटलं आणि चार्जरच्या वायरने....

लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नागप्पा हे कोरोना आणि लॉकडाऊमुळे साडेतीन महिने गावीच होते. पण अशात सीमेवर तणाव वाढला आणि त्यामुळे त्यांना तातडीने श्रीनगरला निघावं लागलं. 24 जुलैला ते निघाले आणि दिल्लीमध्ये 15 दिवस क्वारंटाईन झाले. यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांना पुढे श्रीनगरला रवाना करण्यात आलं.

चाकणमध्ये रात्री घडला हत्येचा थरार, 36 वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून खून

26 जुलैला त्यांना ड्यूटीवर जायचं होतं. पण त्याच रात्री अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखण्यास सुरुवात झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. पण मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. त्यावेळी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

पलंगावरून पडला कोरोना रुग्ण, पण हॉस्पिटलच्या दुर्लक्षामुळे घडला भयंकर प्रकार

नागप्पा यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह मुळ गावी येणार नसून श्रीनगरमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे कुटुंबीयांनी व्हिडिओ कॉलवर शेवटचं अंत्यदर्शन घेतलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 27, 2020, 6:05 PM IST

ताज्या बातम्या