कोरोनाच्या प्रकोपामुळे महाराष्ट्रातील या शहरांना मोठा धोका, ग्रामीण भाग बनतोय हॉटस्पॉट

कोरोनाच्या प्रकोपामुळे महाराष्ट्रातील या शहरांना मोठा धोका, ग्रामीण भाग बनतोय हॉटस्पॉट

मुंबई, पुणेसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. पण आता ग्रामीण महाराष्ट्रातही कोरोना डोकं वर काढत असल्याचं समोर येत आहे.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : कोरोनामुळे देशावर मोठं संकट ओढावलं आहे. देशात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात आहे. यामध्येही मुंबई, पुणेसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. पण आता ग्रामीण महाराष्ट्रातही कोरोना डोकं वर काढत असल्याचं समोर येत आहे. सांगली, नागपूर आणि मराठवाड्यातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं दिसंत. त्यामुळे राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 979 कोरोना रुगणांची भर पडली आहे तर एका दिवसात कोरोनामुळे 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 735 वर गेला आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 295 रुग्णाचा समावेश आहे. सांगली शहर 211 , मिरज शहर 84 रुग्ण आहेत. कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 8225 वर पोहचली असून उपचार घेणारे 383 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

एकता कपूर पुन्हा वादात; वेबसीरिजमधील त्या दृश्यामुळे लोकांनी व्यक्त केला संताप

नागपुरातही कोरोनाने हाहाकार वाढत आहे. नागपुरात कोरोना रुग्णांनी 44 हजारांचा आकडा पार केला आहे. नागपुरात जिल्ह्यात आज आणखी 1319 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे तर आज 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1458 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लातूर जिल्ह्यातही पुन्हा कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. आज तब्बल 502 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 05 जणांचा मृत्यु झाला आहे. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

दुसरीकडे पुण्यातही कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. पुण्यात दिवसभरात 2078 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात 64 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला तर 23 रुग्ण पुण्याबाहेरील असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यात एकूण 111916 पॉझिटिव्ह रूग्णसंख्या असून 16677 ॲक्टिव्ह रुग्ण संख्या आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये एकूण करोना बाधित 58747 इतके आहेत.

ट्राफिक हवालदारांनी घेतली 50 रुपयांच लाच, अधिक्षकांनी वाहतूक शाखाच केली बरखास्त

पश्चिम महाराष्ट्र आणि नागपूर धोक्यात

सप्टेंबरमध्ये रुग्णवाढीचा कळस गाठला जात आहे. गेले काही दिवस 20 हजारांच्या आसपास नवे रुग्ण राज्यात सापडत आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) वाढत असलं, तरी रुग्णवाढीचा दर आणि हा विषाणू गावागावात पसरण्याचा वेग वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याबाहेर नवे रुग्ण दाखल व्हायची संख्या पश्चिम महाराष्ट्र आणि नागपुरात सर्वाधिक आहे.

दरम्यान, Coronavirus ची साथ महाराष्ट्रात भीषण स्वरूप धारण करते आहे. दररोज रुग्णसंख्येचा नवा उच्चांक समोर येतो आहे. गेल्या 24 तासांत 23,816 नवे रुग्ण सापडले, तर 325 रुग्णांचा Covid-19 मुळे मृत्यू झाला. पुणे जिल्ह्याबरोबरच मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचं थैमान पुन्हा नव्याने सुरू झालं आहे. राज्यभरात सध्या 2,52,734 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातले सर्वाधिक पुणे, मुंबई आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये आहेत. कुठल्याही दुसऱ्या राज्यात एवढ्या संख्येने उपचाराधीन कोरोनारुग्ण नाहीत.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 10, 2020, 7:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading