धक्कादायक, कोरोनाबाधित तरुणाचा मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात

धक्कादायक, कोरोनाबाधित तरुणाचा मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात

वसई पालिकेनं या मृत तरुणाच्या नातेवाईकांना होम क्वारंटाइन केलं आहे.

  • Share this:

वसई, 11 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. परंतु, वसईमध्ये एका कोरोनाबाधित तरुणाचा मृतदेह हा नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचा प्रकार घडला आहे.

वसईच्या पापडी परिसरात राहणाऱ्या एका 25  वर्षीय तरुण हा कॅन्सरच्या आजाराने त्रस्त  होता. त्याच्यावर मुंबईच्या फॉरटीज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्या दरम्यान या तरुणाला कोरोनाची लागण झाली. याबद्दल तसे त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही लिहिले आहे.

हेही वाचा - लाडक्या लेकीसह ON POLICE DUTY, महिला पोलीस देतेय कोरोनाशी लढा!

पण असताना या रुग्णालयाने शासनाचे नियम धाब्यावर बसवून त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यामुळे नातेवाईकांनी अंत्यविधी करण्यासाठी त्याचा मृतदेह वसईच्या पापडी इथं आणलाही होता. मुळात कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह हा नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी पसरण्याची भीती असते.

मात्र, वसई विरार पालिकेच्या एका दक्ष अधिकाऱ्याने ही बाब लक्षात आणून देताच त्याचा मृतदेह दफन करण्यास विरोध केला. त्यानंतर या तरुणाचा मृतदेह हा  कुर्ला येथे दहन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.  परंतु, या तरुणाचा मृतदेह हा कुर्ल्यात नेण्यात आला की, नाही याबद्दल अधिकृती माहिली देण्यात आली नाही.

हेही वाचा - आमदारांनी खलाशांच्या कुटुंबियांना केली शिवीगाळ, मीडियावर Audio clip व्हायरल

दरम्यान, वसई पालिकेनं या मृत तरुणाच्या नातेवाईकांना होम क्वारंटाइन केलं आहे. जे जे नातेवाईक आणि व्यक्ती या मृतदेहाच्या संपर्कात आले होते, अशा सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रसार केल्यामुळे हॉस्पिटल आणि नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. परंतु, या प्रकरणावर  फॉरटीज हॉस्पिटलकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

संपादन - सचिन साळवे

First published: April 11, 2020, 1:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading