News18 Lokmat

आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या पोरांचा धिंगाणा, बारबालांसह 13 अटकेत

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2017 07:49 PM IST

आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या पोरांचा धिंगाणा, बारबालांसह 13 अटकेत

28 मार्च : प्रशासनातल्या बड्या अधिकाऱ्यांच्या मुलांनी बारबालांसह इगतपुरीच्या एका रिसॉर्टवर धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी या प्रकरणी पाच बारबालांसह तेरा जणांना अटक केली होती.

सर्व पार्टीबाज तरुण हे मुंबई आणि नाशिकच्या बड्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची मुलं आहेत. अटक केलेल्या या सर्वांना रातोरात जामीन दिला. इगतपुरीच्या मिस्ट्री व्हॅली या रिसॉर्टमध्ये तेराजण पार्टीसाठी आले होते. या लोकांनी दारू पिऊन धिंगाणा घातल्यानंतर शेजाऱ्यांनी  याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत अकराही जणांना ताब्यात घेतलं. या सर्वांवर कलम भा.द.वि.294 प्रमाणे अटक करून जामीन देण्यात आलाय. 57,010 रुपये रोख रक्कम आणि 10 रु.दराच्या 3230 रुपयांच्या नोटही जप्त करण्यात आल्यात. सोबतच 1 मारुती कार सह दारूच्या बाटल्या,1 लॅपटॉप,2 स्पीकर देखील जप्त करण्यात आले. पण प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रातोरात पोलिसांवर दबाव आणून जामिनावर सुटका करुन घेतल्याचं सांगण्यात येतंय.

हे आहेत पार्टीबाज तरुण

1-पृथ्वीराज युवराज पवार -नाशिक

2-सुमित श्रीराम देवरे-नाशिक

Loading...

3-सुशांत जीभाऊ गांगुर्डे-नाशिक

4-ललित सुनील पाटील-पुणे

5-कौस्तुभ विश्वास जाधव-नाशिक

6-शब्बीर आजीम खान-ठाणे

7-जीनतबी मोहम्मद हनिफ-अंधेरी,मुंबई

8-रजिया गुलाम शेख-मिरारोड,मुंबई

9-अंजना महादेव मंडल-मिरभाईंदर,मुंबई

10-शहनाज युसूफ शेख-मिरारोड,मुंबई

11-चिनम्मा अंजलीया दानिया-मिरारोड,मुंबई

12-रहाना अब्दुल हाफिज सुलताना-मालाड,मुंबई

13-धर्मेंद्रकुमार सिंग-सांताक्रूझ,मुंबई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2017 07:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...