मुंबईत कॉन्स्टेबलने केला टॅक्सी चालकावर बलात्कार, कारण आहे 'रेड लाईट एरिया'

मुंबईत कॉन्स्टेबलने केला टॅक्सी चालकावर बलात्कार, कारण आहे 'रेड लाईट एरिया'

ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे 29 वर्षीय रेल्वे पोलीस दलाच्या कॉन्स्टेबलने कॅब चालकावर बलात्कार केला आणि त्यानंतर त्याला जबर मारहाण केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली.

अमित धनकड असे आरोपी कॉन्स्टेबलचे नाव आहे. घटनेनंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पीडित कॅब चालकाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, मी दक्षिण मुंबईतील पी.डी मेलो रोड येथे राईड घ्यायला गेलो होतो. प्रवासी जेव्हा माझ्या गाडीत बसला तेव्हा तिथे आरोपी कॉन्स्टेबल अमित धनकर पोहोचला. तो नशेत होता. त्याने मला त्याला ग्रँट रोडच्या रेड लाईट भागात नेण्यास सांगितले. मी त्याला नकार दिल्यास आरोपींनी मला जबरदस्तीने टॅक्सीबाहेर काढले आणि मला काठीने मारहाण करण्यास सुरवात केली.

इतर बातम्या - छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही, भाजपचा संजय राऊतांवर पलटवार

पीडित कॅब ड्रायव्हरने पुढे सांगितले की, बिअरच्या तुटलेल्या बाटल्याची भीती दाखवत त्याने मला रेल्वे स्थानकाजवळच्या निर्जन ठिकाणी नेले आणि माझ्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने माझ्याकडून 850 रुपये आणि मोबाइल हिसकावून मला सोडण्याच्या बदल्यात 2000 रुपये मागण्यास सुरवात केली. यानंतर मी तेथून पळत एमआरए मार्ग पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली.

मोठी बातमी : या तारखेला बँकांचा 2 दिवसांचा संप, तुमची कामं करा पूर्ण

याबाबत एमआरए मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय कांबळे म्हणाले की, कॅब चालकाच्या तक्रारीनंतर आरोपी कॉन्स्टेबल अमित धनकड यांना कर्नाक डॉकवरून अटक केली. आरोपी हा रेल्वे पोलिसात हवालदार आहे. तो सीएसटी स्थानकात तैनात होता. आरोपी नशेत सापडला होता. आरोपींविरोधात कलम 377, 394, 387 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने आरोपीला 20 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

इतर बातम्या - ‘कॅज्युअल SEX साठी इच्छुक असशील तर संपर्क कर’, गायिकेनं डिजे डिप्लोला केला मेसेज

Published by: Renuka Dhaybar
First published: January 15, 2020, 7:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading