मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

फाशीच्या शिक्षेमुळे डिप्रेशनमध्ये आहेत निर्भयाचे आरोपी, आता जेवणही घश्याखाली जाईना!

फाशीच्या शिक्षेमुळे डिप्रेशनमध्ये आहेत निर्भयाचे आरोपी, आता जेवणही घश्याखाली जाईना!

अक्षय, मुकेश, पवन गुप्ता आणि विनय शर्मा या चार दोषींसह चार-पाच सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून ते स्वत: ला काही नुकसान करून घेऊ नये.

अक्षय, मुकेश, पवन गुप्ता आणि विनय शर्मा या चार दोषींसह चार-पाच सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून ते स्वत: ला काही नुकसान करून घेऊ नये.

अक्षय, मुकेश, पवन गुप्ता आणि विनय शर्मा या चार दोषींसह चार-पाच सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून ते स्वत: ला काही नुकसान करून घेऊ नये.

    नवी दिल्ली, 14 डिसेंबर : देशभर गाजलेल्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातल्या दोषींना कधी फाशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता यासंदर्भात पोलिसांनी महत्त्वाची माहिती मीडियाला दिली आहे. तिहार कारागृहात (Tihar Jail) निर्भया बलात्कार-खून खटल्यातील चारही दोषी डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचं जेवनही कमी झालं आहे. जेलमधील सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. अक्षय, मुकेश, पवन गुप्ता आणि विनय शर्मा या चार दोषींसह चार-पाच सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून ते स्वत: ला काही नुकसान करून घेऊ नये. दोषींना फाशी देण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तिहार कारागृह महासंचालक संदीप गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी तुरूंगात भेट दिली. यासाठी या हायप्रोफाईल प्रकरणात कोणतीही माहिती लिक होऊ नये यासाठी तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांच्या फोनवरही पाळत ठेवण्यात आली आहे. यापूर्वी या चारही दोषींना शुक्रवारी कोर्टाच्या न्यायाधीशांसमोर व्हिडिओ लिंकद्वारे हजर करण्यात आले होते, ज्यांनी त्यांची ओळख पटविली. दोषींना फाशीची शिक्षा व्हावी दरम्यान, निर्भयाच्या आईने शुक्रवारी सांगितले की, 16 डिसेंबरपूर्वी दोषींना फाशी देण्यात यावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, "मी माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून तिच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी मी झगडत राहणार आहे. 16 डिसेंबरपूर्वी तिला फाशी द्यावी अशी माझी इच्छा आहे." इतर बातम्या - देशभरात भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस मैदानात, 'भारत बचाव' रॅलीतून दाखवणार ताकद निर्भया प्रकरणी आरोपींची फाशी होणार रद्द? दया याचिकेच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीशकुमार अरोरा यांनी निर्भयाच्या आई-वडिलांच्या मृत्यू वॉरंट जारी करण्याच्या व सर्व दोषींच्या फाशीची मागणी करण्याच्या याचिकेवरील सुनावणी 18 डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळं फाशीची शिक्षा आता पुढे जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता 17 डिसेंबरला पुढची सुनावणी होणार आहे तर 18 डिसेंबरला पाटिलाया हाऊस कोर्टात सुनावणी होईल. 2012मध्ये झालेल्या या प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले होते. यातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र 7 वर्षानंतरही त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. हैदराबाद एन्काउंटर प्रकरण घडल्यानंतर देशभर प्रचंड असंतोष निर्माण झाला. आरोपींना शिक्षाच होत नसेल तर गुन्हेगारांवर वचक कसा बसणार असा सवाल विचारला जातोय. त्या पार्श्वभूमीवर निर्भया प्रकरणातल्या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाऊ शकते, मात्र आता याबाबात निर्णय हा 18 डिसेंबरनंतर घेतला जाईल. याआधी या आरोपींपैकी तीन जणांनी राष्ट्रपतींकडे केलेली दयेची याचिका फेटाळून लावण्यात आली होती. त्यानंतर विनय शर्मा या चौथ्या आरोपीने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. हा अर्ज फेटाळून लावण्यात यावा अशी शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींकडे केली. याच प्रकरणाचा पुनर्विचार करावी असा अर्जही विनय शर्माने सुप्रीम कोर्टात केला होता त्यावर 17 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. त्यानंतर 18 तारखेला फाशीच्या शिक्षेवर सुनावणी होईल. शिक्षेच्या अंमलबजावणीचं ट्रायलही झालं. शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी डमी ट्रायलही करण्यात आलं आहे. मात्र, आरोपींना फाशी देण्याचे अद्याप जेल प्रशासनाकडे पत्र आलेले नाही. निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावलेल्या तिहारमधील दोषींची दया याचिका फेटाळण्यात आली आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Nirbhaya gang rape case

    पुढील बातम्या