आघाडीतील मित्रपक्षाने मोक्याच्या या 8 जागा मागितल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची गोची

आघाडीतील मित्रपक्षाने मोक्याच्या या 8 जागा मागितल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची गोची

राज्यातील ४८ लोकसभा जागेत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला आघाडीतील मित्रपक्षाने काही मोक्याच्या जागा मागितल्याने नवीन तिढा निर्माण झाला, पण यावर आता दिल्लीत तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 21 डिसेंबर : राज्यातील ४८ लोकसभा जागेत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला आघाडीतील मित्रपक्षाने काही मोक्याच्या जागा मागितल्याने नवीन तिढा निर्माण झाला, पण यावर आता दिल्लीत तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ६-७ जागा अशा आहेत ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आहेत. त्या जागा मित्रपक्ष मागत असल्याने नवीन डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आघाडीतील काही जागेवरचा तोडगा अखेर दिल्ली दरबारात काढण्याची तयारी करण्यात आली आहे.

समाजवादी पार्टी मुंबईत एक जागा मागते आहे. त्यामुळे  नेमकी कोणती जागा द्यायची यावरू काँग्रेसची गोची झाली आहे. विद्यमान प्रिया दत्त यांची जूनी जागा तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा जागा समाजवादी पार्टी मागत आहे. तर दुसरीकडे राजू शेट्टी यांना हातकणंगलेसोबत बुलढाणा लोकसभा मतदार संघ हवा आहे, पण त्यास एनसीपी अनुकूल नाही.

औरंगाबाद, नगर, पुणे, सिंधुदुर्ग या जागावर दबाव टाकत काँग्रेस एनसीपी एकमेकांवर अजून कुरघोडी करत आहे. त्यामुळे यातील नेमक्या जागा कोणत्या घ्यायच्या आणि कोणत्या बदलायच्या यावर आता दिल्लीत तोडगा निघणार आहे.

राज्यातील ४८ लोकसभा जागांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची मिटिंग रात्री उशीरापर्यंत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वत:च्या घ्यायच्या जागांवर बहुतेक तोडगा काढल्याची माहिती देण्यात आली आहे. पण यातल्या काही जागा आघाडी मित्रपक्ष मागत असल्याने दिल्लीत पक्ष श्रेष्ठींकडे तोडगा काढण्यासाठी मध्यस्ती करून, त्यावर विचार करून निर्णय घेतला जाईल असं सांगितले जातं आहे.

पालघर लोकसभा मतदार संघाची जागा बहुजन विकास आघाडी, भिवंडी इथल्या जागेसाठी मुस्लिम उमेदवार द्यावा याचा विचार करत काँग्रेस स्वत: अथवा समाजवादी पार्टीला देण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात आहे. प्रकाश आंबेडकर सोबत येत असतील तर अकोला लोकसभा त्यांना देण्याबाबत मित्रपक्षात चर्चा केली जाईल.

समाजवादी पक्ष, सीपीएम, शेकाप यांसह आघाडीतील काही मित्रपक्षासमवेत काँग्रेस नेते यांच्यात यावर चर्चा होणार आहे. आघाडीतील ज्या जागेवर स्थानिक नेते तोडगा काढू शकत नसतील तिथे एनसीपी नेते शरद पवार, प्रफुल पटेल तर काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे हे दिल्लीत चर्चा करून निर्णय घेणार आहेत.

Special Report: तुमच्यातही माणुसकी असेल पण मुंबईच्या या टॅक्सी चालकांमध्ये नाही... रुग्ण बनून टॅक्सीवाल्यांसोबत केलेलं हे स्टिंग ऑपरेशन याचा पुरावा आहे

First published: December 21, 2018, 10:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading