सोनिया गांधी यांनी सादर केला राजीनामा, मनमोहन सिंग यांच्याकडे केली मोठी मागणी

सोनिया गांधी यांनी सादर केला राजीनामा, मनमोहन सिंग यांच्याकडे केली मोठी मागणी

आपल्याला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी बैठकीत केली. मात्र, पक्षाचं नेतृत्व करत राहावं, अशी विनंती डॉ. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधी यांना केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर देणारं पत्र कार्यसमितीकडे सोपवलं असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर आपल्याला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी बैठकीत केली. मात्र, पक्षाचं नेतृत्व करत राहावं, अशी विनंती डॉ. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधी यांना केली आहे.

अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्याच्या मागणीबरोबरच सोनिया गांधी यांनी नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी सूचनाही काँग्रेस नेत्यांना केल्याची माहिती पुढे आली आहे. खरंतर काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी या महत्त्वाच्या बैठकीआधी सोनिया गांधी यांना पत्र लिहलं होतं. त्यामध्ये काँग्रेसचा अध्यक्ष बदलावा अशी मागणी करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमिवर आज काँग्रेसची ही महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

या बैठकीमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांवर नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले आहे. या आरोपांनंतर अनेक नेते दुखावले गेले असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला आता वादळी स्वरुप प्राप्त झाले आहे. भारतीय जनता पक्षाला मदत करण्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी तर थेट राजीनामा देण्याची धमकी दिली आहे.

सोनिया गांधींना पत्र लिहिणारे 23 नेते BJP शी एकरुप, राहुल गांधींचा गंभीर आरोप

राहुल गांधी यांनी या बैठकीमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये विरोधीपक्षासोबत लढत असताना काही काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधींना यांना पत्र का लिहिले. काही नेते हे भाजपला मदत करत असल्याचा आरोपच राहुल गांधींनी केला आहे.

राहुल गांधी यांच्या या विधानामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी भर बैठकीत पक्षाला इशारा दिला.

काँग्रेसच्या बैठकीत भूकंप, ज्येष्ठ नेत्याने दिली राजीनामा देण्याची धमकी

'भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा सिद्ध झाला तर पदाचा राजीनामा देईल' असं गुलाम नबी आझाद यांनी या बैठकीत ठणकावून सांगितलं. त्यांच्या विधानामुळे बैठकीत एकच खळबळ उडाली.

दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीवरुन काँग्रेसमध्ये दोन गट पाहण्यास मिळत आहे. सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्षपदावरून चांगलेच वादंग सुरू झाले आहे. सोनिया गांधी यांची जर इच्छा नसेल तर राहुल गांधी यांनी समोर यावं अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे काही काँग्रेसचे नेते हे सोनिया गांधींनीच अध्यक्ष राहावे, असं बोलून दाखवलं आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 24, 2020, 1:51 PM IST

ताज्या बातम्या