देशभरात भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस मैदानात, 'भारत बचाव' रॅलीतून दाखवणार ताकद

दिल्लीतील ऐतिहासिक अशा रामलीला मैदानावर भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 डिसेंबर : देशभरात केंद्रातील भाजप नेतृत्वातील मोदी सरकारच्या विरोधात असंतोषामुळे भडका उडाला आहे. काँग्रेसदेखील याचा विरोध करण्याकरिता स्त्यावर उतरलेली आहे. दिल्लीतील ऐतिहासिक अशा रामलीला मैदानावर भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10.30 वाजता रॅलीला सुरुवात होणार असून यामध्ये नागरिकत्व सुधारणा विधयेक, वाढती महागाई, महिला सुरक्षा, सर्वसामान्यांची होणारी लूट या सारख्या विषयावर रॅलीतून प्रहार करण्याची योजना आखण्यात आली आहे.

काँग्रेसच्या या भव्य अशा रॅलीमध्ये सर्व नेते सहभागी होणार असून यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांचे भाषण होणार आहे. त्यामुळे या रॅलीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. या मेळाव्यात काँग्रेस नागरी दुरुस्ती कायद्याचा मुद्दावर अधिक जोर देऊन मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करेल.

काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहात या कायद्याला विरोध दर्शविला होता आणि म्हटले होते की, या कायद्याद्वारे धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संसदेतून हा कायदा संमत होण्याच्या दिवसाला इतिहासाचा काळा दिवस म्हणून बोललं होतं.

यूपीमधील 40 हजार काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले

उत्तर प्रदेशमधील 40 हजाराहून अधिक कार्यकर्ते दिल्लीत काँग्रेसच्या भारत बचाओ रॅलीत पोहोचत आहेत. या मेळाव्यात उत्तर प्रदेशचा ऐतिहासिक सहभाग असणार आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने प्रत्येक विधानसभेत सुमारे 200 लोकांना मेळाव्यात घेण्याचे धोरण आखले होते. उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यातून रेल्वेगाड्या, बस आणि गाड्यांच्या ताफ्यातून कार्यकर्ते दिल्लीत दाखल होत आहेत.

मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले - काँग्रेसचा आरोप

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांच्या म्हणण्यानुसार, देशात मोठी घसरण होत आहे. बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे. महागाई सातत्याने वाढत आहे आणि शेतकर्‍यांची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे, परंतु मोदी सरकार या दिशेने कोणतेही पाऊल उचलत नाही. सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सुरजेवाला म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे जनता नाराज आहे आणि अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. जीडीपी घसरत आहे आणि देश परिवर्तनाच्या मूडमध्ये आहे.

First Published: Dec 14, 2019 09:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading