मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

काँग्रेस पदाधिकाऱ्यांना स्टेजवरून खाली उतरवलं; नानांच्या पदग्रहण सोहळ्यात रंगलं मानापमानाचं नाट्य

काँग्रेस पदाधिकाऱ्यांना स्टेजवरून खाली उतरवलं; नानांच्या पदग्रहण सोहळ्यात रंगलं मानापमानाचं नाट्य

मोदी चले जाव असा ठराव महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशने आज ऑगस्ट क्रांती मैदानात केला.

मोदी चले जाव असा ठराव महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशने आज ऑगस्ट क्रांती मैदानात केला.

मोदी चले जाव असा ठराव महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशने आज ऑगस्ट क्रांती मैदानात केला.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 12 फेब्रवारी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या पदग्रहण समारंभाच्या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यासह काँग्रेस प्रमुख नेते उपस्थितीत होते. गिरगाव चौपाटी ते ऑगस्ट क्रांती मैदान असा बैलगाडीतून नाना पटोले यांनी प्रवास केला. महागाईचा निषेध करण्यासाठी त्यांनी बैलगाडीने प्रवास केल्याचे सांगितले जात आहे.

मात्र कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे नवीन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना पदाधिकाऱ्यांना स्टेजवरुन खाली उतरवण्याची वेळ आली. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड पहिल्यांदा खाली बसले होते. त्यानतंर नाना पटोले यांनी त्यांना स्टेजवर बोलवले.

हे ही वाचा-बाळासाहेब थोरातांना जोरदार धक्का; लोकनियुक्त सरपंचाने धरला राधाकृष्ण विखेंचा हात

त्यामुळे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पदग्रहण समारंभात मानापमान नाट्य पाहायला मिळालं. कोरोना काळात जास्त गर्दी करत सर्व नियंमांचे पायमल्ली केल्याचे पाहायला मिळालं. मोदी चले जाव असा ठराव महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशने आज ऑगस्ट क्रांती मैदानात केला. मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी हा ठराव करण्यात आला.

राज्याच्या राजकारणात नाना पटोले यांच्या प्रवेशांनंतर मोठा बदल होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर राज्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकावर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अशातच त्यांनी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ईव्हीएमबाबत अजित पवार यांचे वेगळे मत आणि माझे मत वेगळे. मला ईव्हीएम नको मी तसं मत व्यक्त केले. अजित पवार वित्त मंत्री आहेत. चावी त्यांच्याकडे म्हणून सर्वच ऐकायचं असं कुठे आहे? असं म्हणतं नाना पटोले यांची अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

राज्यपाल यांना बसवलेच नाही तर मग राज्यपाल यांना उतरवण्याचा मुद्दा येतो कुठे? गर्विष्ठपणाची भाषा भाजपला जास्त लागू होते. भाजपा ही राज्यपालांच्या मुद्दावर बोलते. पण राज्यातील महागाईवर भाजपा बोलत मुद्दाम बोलत नाही. तर असे मुद्दे काढून लक्ष विचलित करण्याचे काम राज्यातील विरोधी पक्ष नेते करीत आहेत.

First published:

Tags: Congress, Mumbai, Nana Patole