BREAKING: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, 20 जागांसाठी उमेदवार घोषित

BREAKING: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, 20 जागांसाठी उमेदवार घोषित

काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य विधानसभेसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 20 जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 03 ऑक्टोबर : काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य विधानसभेसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 20 जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. आतापर्यंत काँग्रेसने 120 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने मध्य नागपूर मतदारसंघातून बंटी शेळके यांना तर पूर्व नागपूर मतदारसंघातून पुरुषोत्तम हजारे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने दुसऱ्या यादीमध्ये एकूण 52 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण, नागपूर दक्षिण मधून गिरीष पांडव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर लातूरमधून दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत अमित देशमुख यांना लातूर शहरातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

धीरज देशमुख मैदानात

काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज यांना अखेर उमेदवारी मिळाली आहे. लातूर ग्रामीणमधून ते आपलं नशीब आजमावून पाहणार आहे. 2014 च्या निवडणुकीतही त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केला होता परंतु, त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. यंदा मात्र, एकाच घरात दोन्ही भावांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. एकाच घरात दोघांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. तर बल्लारपूर मतदारसंघातून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून डाॅ विश्वास झाडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

याआधी काँग्रेसने आपल्या पहिल्या 51 उमेदवारांची यादी 29 सप्टेंबरला जाहीर केली. यामध्ये दिग्गज नेत्यांसह अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात मुंबईतील काही जागांवरही काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मिरा-भाईंदर, भांडूप, अंधेरी, चांदिवली, चेंबूर, वांद्रे, धारावी आणि सायन-कोळीवाडा या जागांवर काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.

काँग्रेसची तिसरी यादी

काँग्रेसची दुसरी यादी

 

 

अशी आहे पहिली यादी

अक्कलकुवा - के.सी पडवी

शहादा - पदमाकर विजयसिंग वालवी

नवापूर - शिरिष नाईक

रावेर - शिरिष चौधरी

बुलडाणा - हर्षवर्धन सकपाळ

मेहकर- अनंत वानखेडे

रिसोड - अमित जनक

धामनगाव - विरेंद्र जगताप

तिवसा - यशोमती ठाकूर

आर्वी - अमर शरद काळे

देवळी- रंजीत प्रताप कांबळे

सावनेर- सुनील छत्रपाल केदार

नागपूर उत्तर- एससी- डॉ. नितीन राऊत

ब्रह्मपुरी- विजय नामदेवराव वजेट्टीवार

चिमुर- सतीश मनोहर वर्जुराकर

वरोरा- प्रतिभा सुरेश धानोरकर

यवतमाळ- अनिल बाळासाहेब मांग्रुळकर

भोकर- अशोकराव शंकरराव चव्हाण

नांदेड उत्तर- डी.पी. सावंत

नायगाव- वसंतराव बळवंतराव चव्हाण

देगलूर- रावसाहेब जयवंत अनंतपुरकर

काळणूरी- संतोष कौतिका तर्फे

पाथरी- सुरेश अंबादास वारपुडकर

फुलंब्री- डॉ. कल्याण वैजंथराव काळे

मालेगाव (मध्य)- शैख असिफ शैख राशिद

अंबरनाथ- रोहित चंद्रकात साळवे

मिरा भाईंदर- सय्यद मुझफ्फर हुसेन

भांडूप (पश्चिम)- सुरेश हरिशचंद्र कोपरकर

अंधेरी (पश्चिम)- अशोकभाऊ जाधव

चांदिवली- मोहम्मद आरिफ नसीम खान

चेंबूर- चंद्रकात दामोदर हंदोरे

वांद्रे (पूर्व)- जिशान जियाउद्दीन सिध्दीकी

धारावी- वर्षा एकनाथ गायकवाड

सायन कोळीवाडा- गणेश कुमार यादव

मुंबादेवी- अमिन अमीराली पटेल

कोलाबा- अशोक अर्जुनराव जगताप

महाड-माणिक मोतिराम जगताप

पुरंदर- संजय चंद्रकांत जगताप

भोर- संग्राम अनंतराव तोपते

पुणे (sc) -रमेश अनंतराव बागवे

संगमनेर- विजय बाळासाहेब थोरात

लातुर शहर- अमित विलासराव देशमुख

निलंगा- अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर

औसा- बासवराज माधवराव पाटील

तुळजापूर- मधुकरराव देवराम चव्हाण

सोलापूर शहर मध्य- प्रणिती सुशील कुमार शिंदे

सोलापूर दक्षिण- मौलबी बाशुमिया सयीद

कोल्हापूर दक्षिण- ऋतुराज संजय पाटील

कारवीर- पी.एन. पाटील सादोळीकर

पळुस- कडेगाव- डॉ. विश्वजीत पतंगराव कदम

288 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

- अधिसूचना - 27 सप्टेंबर.

- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर

- उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षक पाठवणार

- 2 नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार

First published: October 3, 2019, 7:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading