'मोदींना ज्यांनी गोध्राकांडनंतर वाचवलं त्या अडवाणींचं त्यांनीच केलं खच्चीकरण'

'मोदींना ज्यांनी गोध्राकांडनंतर वाचवलं त्या अडवाणींचं त्यांनीच केलं खच्चीकरण'

'भाजपकडून अडवाणी युग संपवल जात आहे. ज्या अडवाणींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यावेळी गोध्रा कांडातून वाचवलं त्याच अडवाणींना आज अडगळीत टाकलं आहे' अस मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं.

  • Share this:

मुंबई, 24 मार्च : 'भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना उमेदवारी न दिल्याने आपणास दुःख झालं. मोदींना ज्यांनी गोध्राकांडनंतर वाचवलं त्या अडवाणींचं खच्चीकरण केलं' अशी खंत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे. रविवारी पंढरपूर इथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार भारत भालके, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

'भाजपकडून अडवाणी युग संपवल जात आहे. ज्या अडवाणींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यावेळी गोध्राकांडातून वाचवलं त्याच अडवाणींना आज अडगळीत टाकलं आहे' अस मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं.

'प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसारख्या संविधान विरोधी पक्षाशी युती केली. धर्माच्या नावावर सगळं सुरू आहे. धर्मनिरपेक्ष घटनेचा खून होतो आहे. देश चांगला सुरू असताना बाधा आणण्याचं काम सुरू केलं. प्रकाश आंबेडकर अशाच लोकांना डोक्यावर घेऊन बसलेत जे संविधानास धक्का लावण्याचं काम करत आहेत' अशी टीकाही सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, 'वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मी पण चर्चेला होतो. मात्र अवास्तव मागणीमुळे ते सोबत आले नाहीत. प्रकाश आंबेडकर वोट कटवा म्हणून प्रसिद्ध आहेत. मतं खायची आणि भाजपला मदत करायची हाच त्यांचा हेतू आहे.'

काँग्रेसमधून भाजपात नेते जात आहेत. याबाब सुशीलकुमार यांना प्रश्न विचारला असता 'आमच्याकडे स्टाॅक आहे. त्यांच्याकडे काहीच नाही म्हणून आमच्या कडून नेतात. आमचे लोक तिथे सेक्युलरिझम शिकवून त्यांना धडा शिकवतील.' असं उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी दिलं.

अशोक चव्हाण यांची ऑडियो क्लीप प्रकरणासारखे प्रकार हे होत असतात. माझ्याबाबतही असं घडल्याची कबुली शिंदे यांनी यावेळी दिली. मोहिते पाटील यांनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी ते त्यांच्या सोबत जाणार नाहीत. आजपर्यंत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी विचारसरणीत काम केलं आहे. ते आपल्यासोबतच राहतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

VIDEO: जेव्हा शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली...!

First published: March 24, 2019, 10:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading