News18 Lokmat

अशोक चव्हाणांचीही जीभ घसरली, भर सभेत दानवेंचा 'साXX' असा केला उल्लेख

काही दिवसांपूर्वी दानवेंनी शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरले होते. त्याच वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी टीका करताना अशोक चव्हाण यांनीही भाषेची मर्यादा ओलांडली

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 21, 2017 11:40 AM IST

अशोक चव्हाणांचीही जीभ घसरली, भर सभेत दानवेंचा 'साXX' असा केला उल्लेख

21 मे : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची जीभ घसरली. मालेगाव महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत चव्हाण यांच्या भाषेची पातळी घसरली. त्यांनी भाषण करताना दानवे यांचा 'साले' असा उल्लेख केला आहे.

काही दिवसांपूर्वी दानवेंनी शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरले होते. त्याच वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी टीका करताना अशोक चव्हाण यांनीही भाषेची मर्यादा ओलांडली. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

24 तारखेला होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण मालेगावमध्ये आले होते. यावेळी त्यांनी ऊर्दू भाषेतून भाषण करत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर  जोरदार हल्लाबोल केला.

केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे 'सरकार' नसून 'सावकार' आहेत. हे सरकरा गरीबांना लुटण्याचं काम करत आहे, अशा शब्दात अशोक चव्हाणांनी  भाजप सरकारवर टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2017 11:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...