मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कंगनाचा 'तो' व्हिडीओ ट्वीट करून काँग्रेस नेत्यानं NCB कडे कारवाईची मागणी

कंगनाचा 'तो' व्हिडीओ ट्वीट करून काँग्रेस नेत्यानं NCB कडे कारवाईची मागणी

कंगनाच्या व्हिडीओबद्दल तुम्ही तिला कधी फोन करणार आहात? असं असूनही मोदी सरकारने तिला वाय (Y) दर्जाची सुरक्षा दिली आहे.

कंगनाच्या व्हिडीओबद्दल तुम्ही तिला कधी फोन करणार आहात? असं असूनही मोदी सरकारने तिला वाय (Y) दर्जाची सुरक्षा दिली आहे.

कंगनाच्या व्हिडीओबद्दल तुम्ही तिला कधी फोन करणार आहात? असं असूनही मोदी सरकारने तिला वाय (Y) दर्जाची सुरक्षा दिली आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई, 30 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतविरुद्ध (Bollywood Actress Kangana Ranaut) महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) हा वाद अजुन शमन्याची चिन्ह दिसत नाही आहे. कारण काँग्रेस नेते सचिन सावंत (Congress Leader Sachin Sawant) यांनी कंगनाचा ड्रग्सबाबत (Drugs) एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. कंगना मुंबईत परत आली आहे. आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB)तिची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. हेही वाचा...राजकारणात नवा ट्विस्ट! आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल 'कंगनाच्या व्हिडीओबद्दल तुम्ही तिला कधी फोन करणार आहात? असं असूनही मोदी सरकारने तिला वाय (Y) दर्जाची सुरक्षा दिली आहे. कारण ती बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटसंबंधी माहिती देणार होती. मात्र, ती माहिती लपवत आहे आणि तो मोठा गुन्हा आहे.' असं देखील सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगनानं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होतं. एवढंच नाही तर कंगना हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही सवाल केले होते. तेव्हापासून कंगना ही महाविकास आघाडी सरकारसह नेत्याच्या रडारवर आहे. दरम्यान, चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत मुंबईत परतली आहे. तिने मंगळवारी मुंबा देवी आणि दादर येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे यावेळी कंगनानं हिरवी साडी नेसली होती. नाकात नथ आणि केसात गजरा माळला होता. सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर तिनं पत्रकारांशीही संवाद साधला. शिवसेनेचं नाव न घेता लगावला टोला.. मुंबईत राहण्यासाठी मला केवळ गणपती बाप्पाची परवानगी लागते. इतर कोणाकडे मी परवानगी मागत नाही, अशा शब्दांत कंगना हिनं शिवसेनेचं नाव न घेता खोचक टोला लगावला होता. 'बाईंच्या डोक्यावर अपघात झाला की काय?' शिवसेनेत आलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (urmila matondkar) यांनी यावरून कंगनाला चांगलंच लक्ष्य केलं आहे. 'माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्याबद्दल. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असं खोचक ट्वीट उर्मिला यांनी केलं. हेही वाचा..समझनेवाले को इशारा काफी है! संजय राऊत यांचं भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज काही दिवसांपूर्वी कंगना आणि राज्य सरकार यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला होता. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय बोचरी टीका केली होती. तसंच मुंबईला ‘पाकव्याप्त काश्मीर’ (POK) असंही म्हटलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यानंतर केवळ सरकारच नाही तर सामान्य मुंबईकरांचं मनही दुखावलं गेलं होतं.
First published:

पुढील बातम्या