विखेंच्या राजीनाम्याचा काँग्रेसला धसका, आजची राहुल गांधींची सभा उत्साह वाढवणार का?

विखेंच्या राजीनाम्याचा काँग्रेसला धसका, आजची राहुल गांधींची सभा उत्साह वाढवणार का?

राहुल गांधींची ही सभा शिर्डीच्या राजकारणात काय रंग आणणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

  • Share this:

शिर्डी, 26 एप्रिल : शिर्डी लोकसभा मतदारसंघात सध्या वातावरण ढवळून निघालं आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा, जिल्हाध्यक्षाने पद सोडले आणि जिल्हा काँग्रेस कमिटीही बरखास्त करण्यात आली. अशा परिस्थितीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची संगमनेर इथं सभा होणार आहे. थोड्या वेळात होऊ घातलेली राहुल गांधींची ही सभा शिर्डीच्या राजकारणात काय रंग आणणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

शिर्डीच्या संगमनेरमध्ये 5 वाजता राहुल गांधी यांची सभा होणार होती पण. आता ती सायंकाळी 7 वाजता होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यासाठी सभेची जय्यत तयारी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राहुल गांधी यांची आज बिहार, ओडीशा येथील सभा झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर इथं त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

मात्र, राहुल गांधी यांच्या विमानाला झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे सगळ्या सभा उशिराने होत आहेत. त्यामुळे संगमनेर येथील सभेला राहुल गांधी वेळेत पोहचतील की नाही याबाबतही शंका उपस्थित होते आहे. दरम्यान, सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रीरामपूर इथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांची सभा म्हणजे मनोरंजन असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती.

राहुल गांधींच्या सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांची नवी खेळी, राजीनामा दिलेल्या काँग्रेस नेत्याची घेतली भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांची भेट घेतली. करण ससाणे यांनी मंगळवारीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं.

हेही वाचा : मावळमध्ये अजित पवारांची खेळी, गिरीश बापटांची निवडणूक आयोगाकडे धाव

मुख्यमंत्री फडणवीसांची शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सभा पार पडली. या सभेपूर्वी त्यांनी करण ससाणे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र मतदानाच्या काही दिवस झालेल्या या भेटीन शिर्डीत काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची संगमनेर इथं सभा होणार आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी ही खेळी खेळून काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केला अशी तुफान चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

करण ससाणे यांचा राजीनामा

अहमदनगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच शिर्डी मतदारसंघात काँग्रेसला मत देऊ नका, असं आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे गेले काही दिवस काँग्रेसमध्ये नाराज होते. त्यानंतर आता त्यांचे समर्थकही काँग्रेसपासून दूर होताना दिसत आहेत. अशातच आता नगर जिल्हाध्यक्षांनीही राजीनामा दिला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदानाला काही दिवसच बाकी असताना घडलेल्या या घडामोडींमुळे हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

VIDEO : भाजप नेत्याच्या विमानातून उतरवला पैशांनी भरलेला बाॅक्स, अनिल गोटेंचा गंभीर आरोप

First published: April 26, 2019, 6:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading