पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींचा गंभीर आरोप, प्रियांका गांधीही उपस्थित

पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींचा गंभीर आरोप, प्रियांका गांधीही उपस्थित

काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी टीका केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल, नोटबंदी, घटनात्मक संस्थांचा अपमान, लोकशाहीची हत्या, महाआघाडी,  आघाडीचं राजकारण, या सर्व विषयांवर काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिलं. यावेळी मोदींनी 'उलटा चोर चौकीदार को डांटे' असे म्हटले होते.

पंतप्रधान मोदींच्या आरोपाला रात्री उशिरा काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीनंतर प्रत्युत्तर देताना राफेल प्रकरणावरुन गंभीर आरोप केले. संरक्षण करारात पंतप्रधान मोदींनी ३० हजार कोटी रूपयांची चोरी करण्यास मदत केली असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी प्रियंका गांधीही त्यांच्यासोबत होत्या.

तुमचे 55 वर्षे माझे 55 महिने याची तुलना करण्यास तयार असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी लोकसभेत काँग्रेसवर घणाघात केला होता. महाआघाडीत जे पक्ष आहेत ते अटलजींच्या काळात आमच्यासोबत होते. धोकेबाजी करून ते गेले ही त्यांची सवय आहे. महाआघाडीत असणारे सर्व पक्ष हे घराणेशाहीचे पक्ष असून त्यातले बहुसंख्य नेते हे जामीनावर आहेत.  काँग्रेसमध्ये जाणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते याची आठवणही मोदींनी यावेळी करून दिली होती.

'उलटा चोर चौकीदारको डांटे', असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर संसदेत हल्लाबोल केला. 'चौकीदारही चोर है,' असं म्हणत राफेल प्रकरणावरून राहुल गांधी हे मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल यांच्या याच टीकेला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलं. 'मी माझ्या मर्यादेत आहे हेच चांगलं आहे', असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना उत्तर दिलं.

मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे:

महाआघाडी नाहीतर महामिलावट, मोदींची महाआघाडीवर टीका

काँग्रेसचे 55 वर्ष आणि आमचे 55 महिने याची तुलना करा म्हणजे खरं काय ते कळेल.

मी गरीबांसाठी जगतोय आणि गरिबांसाठीच मरणार आहे.

मोदींवर टीका करताना चार बोटं आपल्याकडे आहेत ते काँग्रेसने आधी बघावं

काँग्रेसच्या एका घराण्याशिवाय काही लोकांना दुसरं काहीही दिसत नाही.

भारत 11 वरून जगातली 6व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली तरीही काही लोकांना वेदना होत आहे.

येणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा

सर्वांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि निकोप स्पर्धेसाठी सदिच्छा

मोदींवर कितीही टीका करा पण मोदीवर टीका करताना देशाची बदनामी करू नका. लंडनमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेऊन तुम्ही काय देशाचा गौरव वाढवला का?' असा सवाल करत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

First published: February 8, 2019, 8:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading