घरावर संकट आलं म्हणून पळून जायचं का? बाळासाहेब थोरातांचा भावनिक सवाल

घरावर संकट आलं म्हणून पळून जायचं का? बाळासाहेब थोरातांचा भावनिक सवाल

संगमनेरची जबाबदारी तुम्ही सांभाळा, मी राज्य सांभाळतो, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी महिलांना केले.

  • Share this:

हरीश दिमोटे,(प्रतिनिधी)

शिर्डी,7 सप्टेंबर: राजकारण करताना उड्या मारायचं काम आपण करत नाही. सत्ता बदलली का मारली उडी. घरावर संकट आले म्हणून पळून जायचं का? असा भावनिक सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. संगमनेर येथे आयोजित महिला मेळाव्यात थोरात बोलत होते. थोरातांनी यावेळी बोलताना पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.

शनिवारी संगमनेर तालुक्यात महिलांचा मेळावा घेण्यात आला. दूध संघाच्या प्रांगणात झालेल्या या मेळ्याव्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दूध उत्पादक महिलांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी विकास कामांचा पाढा वाचला. तसेच काँग्रेसमधून पक्ष सोडून जात असलेल्या नेत्यांवर टीकास्त्र ओढताना माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे. माझा मतदार संघ आता तुम्हीच सांभाळा, असे आवाहन त्यांनी महिलांना केले. काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्ष सोडला तर आज भाऊसाहेब कांबळे यांनी. यावेळी भाषणातून थोरात यांनी कोणाचेही नाव न घेता जोरदार टीका केली.

राजकारण करताना उड्या मारायचं काम आपण करत नाही. सत्ता बदलली का मारली उडी. घरावर संकट आले म्हणून पळून जायचं का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी केला. मी भक्कम पाय रोवून उभा आहे. म्हणूनच सोनिया गांधींनी विश्वासाने माझ्या खांद्यावर पक्षाची जबाबदारी टाकली आहे. संगमनेरची जबाबदारी तुम्ही सांभाळा, मी राज्य सांभाळतो, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी महिलांना केले.

VIDEO:आम्हीही ऐकून घेणार नाही, जलील यांचा 'वंचित'वर पलटवार

Published by: Sandip Parolekar
First published: September 7, 2019, 7:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading