News18 Lokmat

काँग्रेस निवडणुकीच्या तयारीला, राहुल गांधींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

सकाळी 10.30 वाजता राहुल गांधी यांच्या निवासस्थानी नेत्यांची ही महत्त्वाची बैठक होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2019 07:37 AM IST

काँग्रेस निवडणुकीच्या तयारीला, राहुल गांधींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी : आगामी निवडणुका लक्षात घेता आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यासाठी आता काँग्रेसही मैदानात उतरली आहे. शनिवारी काँग्रेसच्या विविध राज्यातील प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सकाळी 10.30 वाजता राहुल गांधी यांच्या निवासस्थानी नेत्यांची ही महत्त्वाची बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष संजय निरुपम, राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आदी सहभागी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तशी नेत्यांचे आरोप-प्रत्यारोपही वाढत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भोपाळमध्ये जाहीर सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राफेल घोटाळ्यात मोदींनी 30 हजार कोटी रुपये पळवले असा आरोप त्यांनी केला.

वर्षाला 6 हजार रुपये देऊन मोदी सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन याही संसदेत खोटं बोलल्या असं म्हणत काँग्रेस अध्यक्षांनी पुन्हा एकदा जेपीसी चौकशीची मागणी केली आहे. राहुल म्हणाले की, "रॉबर्ट वाड्रा, चिदंबरम यांची तपासणी करावी. आपण सगळ्यांना कायद्याने न्याय मिळवून देता तर मग राफेलचीही तपासणी करावी. राफेलमध्येही बोला.' असंही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

राहुल म्हणाले, "मोदी काँग्रेसला संपवायला निघाले आहेत. पण देशातल्या अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आलं आहे. तर देशातही काँग्रेसचच सरकार येणार आहे. काँग्रेसचं सरकार आलं तर सरकार प्रत्येक गरिबाला आम्ही किमान उत्पन्नाची हमी देऊ. 17 रुपये देऊन थट्टा करणार नाही. " असा टोलाही त्यांनी लगावला.

Loading...

एकीकडे, पोस्टर, घोषणा, सोशल मीडियाच्या माध्यमातून परस्परांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही पक्ष सोडताना दिसत नाहीत. अशाच प्रकारे राहुल गांधी यांच्या भोपाळ दौऱ्यादरम्यान काँग्रेसनं केलेली पोस्टरबाजी बुमरँग झाल्याचं चित्र पाहायाला मिळालं. राहुल गांधी सध्या भोपाळ दौऱ्यावर असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'रावण' तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना 'रामा'च्या भूमिकेत दाखवलं.

पण, हे पोस्टर काँग्रेसवर बुमरँग झालं. त्यावर टीका देखील झाली. अखेर, पंतप्रधान नरेंद्र मोदींना रावण दाखवलेलं ते पोस्टर काढण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली. शिवाय, 'चौकीदार ही चोर है' अशी घोषणा देखील या पोस्टरवर लिहिण्यात आली होती.


VIDEO : ...नाहीतर आज तुमच्यात नसतो, अजितदादांनी सांगितला थरारक किस्सा


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2019 07:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...