निवडणूक आयोगावर पंतप्रधानांचा दबाव - काँग्रेस

निवडणूक आयोगावर पंतप्रधानांचा दबाव - काँग्रेस

निवडणूक आयोगावर पंतप्रधान मोदींचा दबाव आहे, असा थेट आरोप काँग्रेसनं केलाय. पंतप्रधान मोदींनी मतदानाला जाताना रोड शो केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. राहुल गांधींसांठी एक न्याय आणि मोदींसाठी वेगळा न्याय, असं का ? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलाय.

  • Share this:

14 डिसेंबर, नवी दिल्ली : निवडणूक आयोगावर पंतप्रधान मोदींचा दबाव आहे, असा थेट आरोप काँग्रेसनं केलाय. पंतप्रधान मोदींनी मतदानाला जाताना रोड शो केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. राहुल गांधींसांठी एक न्याय आणि मोदींसाठी वेगळा न्याय, असं का ? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलाय.

काल राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मीडियाला साधी मुलाखत देताच निवडणूक आयोग त्यांना नोटीस बजावतं आणि दुसरीकडे पंतप्रधान मतदानाच्या दिवशी रोड शो काढतात, तरीही त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही, हा कुठला न्याय ? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय. मोदींनी मतदान केल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन आयोगावर पंतप्रधान दबाव टाकत असल्याचा आरोप केलाय. भाजपनं आचारसंहितेचा भंग केला आहे, पण त्यावर निवडणूक आयोग गप्प आहे, असंही सुरजेवाला म्हणाले.

First published: December 14, 2017, 2:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading