मुंबईच्या काँग्रेस कार्यालयात अज्ञातांकडून तोडफोड

काँग्रेस प्रदेश कार्यालयाची अज्ञातांनी केली तोडफोड केलीय. सीएसटीजवळच्या कार्यालयात ही तोडफोड करण्यात आलीय. ही तोडफोड नेमकी कोणी केली ? हे अजून समजू शकलं नसलं तरी मनसेच्या कार्यकर्त्यांवरच संशय व्यक्त केला जातोय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 1, 2017 11:19 AM IST

मुंबईच्या काँग्रेस कार्यालयात अज्ञातांकडून तोडफोड

01 नोव्हेंबर, मुंबई : मुंबई काँग्रेस कार्यालयाची अज्ञातांनी केली तोडफोड केलीय. सीएसटीजवळच्या आझाद मैदानाजवळील कार्यालयात ही तोडफोड करण्यात आलीय. त्यात ऑफिसमधील सर्व काचा फोडण्यात आल्यात. तसंच फर्निचरचीही मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आलीय. पहाटे किंवा सकाळच्या वेळेत काही अज्ञातांकडून ही तोडफोड करण्यात आलीय. पण ही  तोडफोड नेमकी कोणी केली ? हे अजून समजू शकलं नसलं तरी मनसेच्या कार्यकर्त्यांवरच संशय व्यक्त केला जातोय. फेरीवाल्यांच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांच्यात उभा संघर्ष पेटलाय. याच वादातून हा हल्ला झाल्याचं बोललं जातंय. पण त्याला अजून कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. हल्ला झाला त्यावेळी काँग्रेसच्या कार्यालयात कोणीच उपस्थित नव्हतं. त्यामुळे या तोडफोडीत कोणीच जखमी झालेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 11:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...