Home /News /news /

काँग्रेसमध्ये मोठी खळबळ, सोनिया गांधी यांना पाठवलं आणखी एक पत्र

काँग्रेसमध्ये मोठी खळबळ, सोनिया गांधी यांना पाठवलं आणखी एक पत्र

कॉंग्रेसला आता घराणेशाहीच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊन काम करावं लागेल असंह त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : कॉंग्रेसमध्ये अजूनही धुसपूस सुरूच आहे. कारण आता काँग्रेसच्या नेत्यांकडून आणखी एका पत्राचा बॉम्ब फोडण्यात आला आहे. पण यावेळी हे पत्र महाराष्ट्रातून नसून ते उत्तर प्रदेशातून पाठवण्यात आलं आहे. कॉंग्रेसच्या 9 वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष चालवावा, असा सल्ला त्यांनी पत्रातून दिला असल्याची माहिती देण्यात येत आहे. कॉंग्रेसला आता घराणेशाहीच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊन काम करावं लागेल असंह त्यांनी पत्रात म्हटलं आहे. या पत्रावर माजी खासदार संतोष सिंह (former MP Santosh Singh), माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी (former minister Satyadev Tripathi), माजी आमदार विनोद चौधरी (former MLAs Vinod Chaudhary), भुधर नारायण मिश्रा (Bhoodar Narain Mishra), नेकचंद पांडे (Nekchand Pandey), स्वयं प्रकाश गोस्वामी (Swayam Prakash Goswami) आणि संजीव सिंह (Sanjeev Singh) यांनी स्वाक्षरी केली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची अवस्था सगळ्यात वाईट आहे असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे. अरे देवा! पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच मंत्र्यासह तब्बल 21 जणांना झाला कोरोना या पत्रामध्ये काँग्रेसमध्ये ढिसाळ कारभार सुरू असल्याचं नेत्यांनी स्पष्टपणे लिहलं आहे. राज्यामध्ये कसा कारभार सुरू आहे याची माहिती तुम्हाला प्रभारींकडून मिळत नाही असं दिसतंय. आम्ही आपल्याला भेटण्यासाठी गेल्या एका वर्षापासून मागणी करत आहोत. पण आम्हाला नकार दिला गेला. काही मंडळी ही वेतन तत्त्वावर काम करतात आणि पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत अशा लोकांकडे पदं आहेत, असा दावा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला आहे. खवळलेल्या समुद्रात दोन बोटी बुडाल्या, पाहा भीषण वादळाचे 8 PHOTOS या नेत्यांना पक्षाची विचारधारा माहित नाही. पण, त्यांना उत्तर प्रदेशात काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधून हा पक्ष चालवावा. अन्यथा काँग्रेसचा इतिहास जमा होईल असं या पत्रात म्हटले आहे. उत्तर प्रदेशची जबाबदारी असलेल्या आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनाही यावेळी लक्ष्य करण्यात आलं आहे. चार पानांच्या पत्रामध्ये सोनिया गांधी यांनी घराणेशाही पलिकडे जावून काम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे या सगळ्यावर आता काँग्रेसमध्ये आणखी काय वादळ येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Sonia gandhi

    पुढील बातम्या