सोनिया गांधींना पत्र लिहिणारे 23 नेते BJP शी एकरुप, राहुल गांधींचा गंभीर आरोप

सोनिया गांधींना पत्र लिहिणारे 23 नेते BJP शी एकरुप, राहुल गांधींचा गंभीर आरोप

या बैठकीच्या एक दिवस अगोदर कॉंग्रेसच्या ज्या 23 नेत्यांकडून सोनिया गांधींनी पत्र लिहिण्यात आलं होतं त्या सर्व नेत्यांवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टीका केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : आज कॉंग्रेस कार्यकारी समितीची (CWC Meeting) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. यामध्ये पक्षाचे अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची ऑफर दिली आहे. नवीन पक्षाध्यक्ष निवडण्यासाठी त्यांनी सदस्यांना सांगितलं आहे. या बैठकीच्या एक दिवस अगोदर कॉंग्रेसच्या ज्या 23 नेत्यांकडून सोनिया गांधींनी पत्र लिहिण्यात आलं होतं त्या सर्व नेत्यांवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टीका केली आहे. हे सर्व नेते हे भाजपशी एकरूप असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांना कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले की, जेव्हा पक्ष राजस्थान आणि मध्य प्रदेशात विरोधी शक्तींशी लढत होता त्यावेळी सोनिया गांधी अस्वस्थ होत्या तेव्हा असं पत्र का नाही लिहलं गेलं? राहुल गांधींच्या या टीकेमुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता दोन गट पडले आहे. अशातच काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीला हादरा देणारे विधान केले आहे. 'गांधी घराण्यानेच नेतृत्त्व करावे. सोनिया गांधी यांनी नकार दिल्यामुळे राहुल गांधी हे नेतृत्त्व करण्यास सक्षम आहे.

काँग्रेसच्या बैठकीत भूकंप, ज्येष्ठ नेत्याने दिली राजीनामा देण्याची धमकी

मुळात राहुल गांधी यांच्या इच्छेनुसारच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाला होता. उद्या जर राहुल गांधी यांनी निर्णय घेतला की, सरकारमधून बाहेर पडावे तर आम्ही बाहेर पडू' असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

तसंच, 'जर राहुल गांधी हे जर महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसते तर सरकार स्थापन झाले नसते. त्यांच्या सहमतीनेच सरकार स्थापन झाले आहे. उद्या जर राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे सांगितले तर आम्हाला एक मिनिटही लागणार नाही', असंही वडेट्टीवार यांनी सांगितले.

सेल्फीच्या मोहात तरुण वयातच गमावला जीव, साताऱ्यातली धक्कादायक घटना

'आमच्या पक्षात लोकशाही आहे, त्यामुळे सर्वाना बोलण्याचा अधिकार आहे. मला वाटते गांधी परिवाराकडे नेतृत्व असावे, त्यांच्यातच पक्ष आणि देश सांभाळण्याची क्षमता आहे. आमच्या इथे भाजप पक्षासारखी हुकुमशाही नाही. जे दोन व्यक्ती निर्णय घेतील ते स्वीकारावे लागेल', असं म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपला टोला लगावला.

काँग्रेसच्या राज्याच्या कार्यकारी अध्यक्ष तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्ष व्हावे अशी मागणी केली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 24, 2020, 1:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या