News18 Lokmat

मुंबईत काँग्रेस नेत्यांची बैठक, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार का?

अनेक बैठकीकडे पाठ फिरवलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील या बैठकीस येतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या बैठकीत राज्यात लोकसभा निवडणूकीच्या तयारी, प्रचार यंत्रणा, तसंच पुढील नियोजन याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 30, 2019 11:25 AM IST

मुंबईत काँग्रेस नेत्यांची बैठक, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार का?

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 30 मार्च : काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांसह अनेकजण या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

यापूर्वी अनेक बैठकीकडे पाठ फिरवलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील या बैठकीस येतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या बैठकीत राज्यात लोकसभा निवडणूकीच्या तयारी, प्रचार यंत्रणा, तसंच पुढील नियोजन याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी काँग्रेसने लोकसभा प्रचारासाठी देशभरातून स्टार प्रचारकांची 40 नावं जाहीर केली होती. त्यात विखेचंदेखील नाव होतं. त्यामुळे या बैठकीत ते उपस्थित राहणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तर पुणे, रावेर, सांगली लोकसभा बाबत अद्याप ही आघाडी चर्चा काही मतभेद आहेत. याबाबतही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

Loading...

पुणे लोकसभा काँग्रेस पक्षाचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही. त्यासाठी अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा असताना आज प्रवीण गायकवाड यांना काँग्रेस पक्षात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे शिंदे ऐवजी गायकवाड यांना पुणे येथून उमेदवारी देण्याबाबत हालचाली ही सुरू आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


मोदी, घराणेशाही आणि पहिल्या भाषणावर काय म्हणाले पार्थ पवार; UNCUT मुलाखत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 11:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...