राज्यात 'सेना-महाआघाडी' करणार सत्ता स्थापन? सोनिया गांधी ठरवणार महाराष्ट्राचं भवितव्य!

सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. जयपूरमध्ये काँग्रेस आमदारांची हायकमांडसोबत बैठक पार पडली.

News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2019 02:25 PM IST

राज्यात 'सेना-महाआघाडी' करणार सत्ता स्थापन? सोनिया गांधी ठरवणार महाराष्ट्राचं भवितव्य!

मुंबई, 10 नोव्हेंबर : सध्या राज्यात शिवसेना-भाजप मध्ये सत्तासंघर्ष अधिक वाढल्याचे पाहायला मिळतं. राज्यपाल यांनी भाजपाला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिल्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. जयपूरमध्ये काँग्रेस आमदारांची हायकमांडसोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, जयपूरमधली ही बैठक पार पडली असून आता सोनिया गांधी या महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा आणि आमदारांचा जयपूरमल्या बैठकीत निर्णय झाला असल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेच्या घडामोडींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण दिल्यानंतर आता इतर पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याची चिन्ह आहेत. एकीकडे संजर राऊत यांनीही आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस आपला शत्रू नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे.

सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार असून यासंदर्भात राष्ट्रवादीला पत्र पाठवणार असल्याची चर्चा या बैठकीमध्ये सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे जर असं झालं तर हा भाजपसाठी सगळ्यात मोठा धक्का आहे. यासगळ्यात काँग्रेसचे नेता आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवले आणि त्यावेळी जर शिवसेनेने पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करेल, असे मिलिंद देवरा म्हणाले आहेत.

इतर बातम्या - शोले पार्ट 2! एकतर्फी प्रेमवीराने चक्क प्रेयसीच्या घरासमोरील भिंत पाडली, कारण...

काँग्रेस पाठिंब्याच्या चर्चेनंतर शिवसेनेची महत्त्वाची बैठक

Loading...

सध्या शिवसेनेच्या आमदारांना मालाडमध्ये द रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याठिकाणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, गजानन कीर्तिकर, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, अनिल देसाई  यांनी काल रात्री उशिरा हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली आहे. तर आज उद्धव ठाकरेही आमदारांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.

सेना आमदार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक इथे पार पडणार आहे. एकीकडे काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या अनुषंगाने शिवसेना काँग्रेसचा पाठिंबा घेत भाजपला धक्का देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, भाजपसोबत युतीत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना इच्छुक नसल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

इतर बातम्या - काँग्रेस पाठिंब्याच्या चर्चेनंतर शिवसेनेची बैठक, उद्धव ठाकरे 'इन अॅक्शन'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 02:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...