काँग्रेस नेत्याच्या रॅलीत अॅम्बुलन्स अडकली, 7महिन्याच्या बाळाचा मृत्यू

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांनी सायकल रॅली काढली होती. त्यामुळे जवळपास अर्धातास वाहतूक कोंडी झाली होती.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2018 09:34 PM IST

काँग्रेस नेत्याच्या रॅलीत अॅम्बुलन्स अडकली, 7महिन्याच्या बाळाचा मृत्यू

हरियाणा, 23 आॅगस्ट : काँग्रेस नेत्याच्या एका रॅलीमध्ये रुग्णवाहिका अडकल्यामुळे एका सात महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. हरियाणातील सोनीपत इथं ही घटना घडली. मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांनी सायकल रॅली काढली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रुग्णवाहिकेला जाण्यासाठी मार्ग मिळाला नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांनी सायकल रॅली काढली होती. त्यामुळे जवळपास अर्धातास वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका अडकली होती. यात एका सात महिन्याच्या मुलाला रुग्णालयात घेऊन जात होते.  या रॅलीमुळे रुग्णवाहिका अर्धातास अडकून राहिली. रुग्णवाहिका वेळीच न पोहोचल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला. आजाराने त्रस्त या चिमुकल्याने जीव सोडला. या बाळाच्या आई वडिलांनी न्याय मिळावा यासाठी याचना केलीये.

पण, या घटनेबद्दल काँग्रेसच्या नेत्याने पोलिसांनाच जबाबदार धरलंय. आम्हाला जेव्हा कळलं की रॅलीमुळे वाहतूक कोंडी झाली आहे आणि यात एक रुग्णवाहिका अडकलीये तर आमच्या कार्यकर्त्यांना रास्ता मोकळा करून दिला होता. पण पोलिसांनी योग्य नियोजन केलं नाही, रुग्णवाहिकेत डाॅक्टर आणि आॅक्सिजनचा ठिक पुरवठाही नव्हता असा आरोपही तंवर यांनी केला.

या प्रकरणी हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी मुख्यमंत्री आणि पोलिसांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. तसंच या प्रकरणी गुन्हा दाखल करणार अशी माहिती दिली.

VIDEO : केरळमध्ये महाप्रलयानंतर आता घरात शिरताहेत मगरी !

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 09:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...