राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्या म्हणाल्या, दहशतवाद्यांसारखे दिसतात पंतप्रधान मोदी

राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्या म्हणाल्या, दहशतवाद्यांसारखे दिसतात पंतप्रधान मोदी

हे वादग्रस्त वक्तव्य करत्यावेळी त्या ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित होते. विजया शांती या तेलंगनामध्ये काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 मार्च : तेलंगनाच्या शमशाबादमध्ये काँग्रेस नेता विजया शांती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांसारखे दिसतात. लोकांवर प्रेम करण्यापेक्षा नरेंद्र मोदी जनतेला घाबरवत आहेत' हे वादग्रस्त वक्तव्य करत्यावेळी त्या ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित होते. विजया शांती या तेलंगनामध्ये काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत. त्यांनी अभिनय क्षेत्रातून राजकारणामध्ये पाय ठेवला आहे.

राहुल गांधी यांच्या भाषणाआधी विजया शांती म्हणाल्या की, 'देशात प्रत्येक जण घाबरला आहे. कारण पंतप्रधान मोदी हे दहशतवाद्यासारखे दिसतात. माहित नाही ते कधी बॉम्ब फोडतील. लोकांशी प्रेमाने बोलायचं सोडून ते जनतेला घाबरवत आहेत. एखाद्या पंतप्रधानाला असं नाही वागलं पाहिजे. ' त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
या सभेदरम्यान, राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला. 'पंतप्रधान मोदींना 2 भारत देश बनवायचे आहेत. एक गरीबांचा आणि एक श्रीमंतांचा' असा घणाघात राहुल गांधींनी केला.

ते पुढे म्हणाले की, '5 वर्षात मोदी 2 भारत देश करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक श्रीमंतांचा भारत देश जिथे ते प्रायव्हेट विमानाने फिरत आहेत आणि दुसऱ्या गरीबांच्या भारत देशात आपला शेतकरी हक्कांसाठी हात जोडत आहे आणि त्यात अर्थमंत्री म्हणतात की, कर्जमाफी करणं काही पॉलिसी नाही आहे' अंस राहुल गांधी म्हणाले.


VIDEO :15 फूट खोल नाल्यात पडली गाय, असं केलं रेस्क्यू आॅपरेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 11:38 PM IST

ताज्या बातम्या