VIDEO: '15-20 दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते चकाचक होतील'

VIDEO: '15-20 दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते चकाचक होतील'

15-20 दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे चकाचक रस्ते होतील.' असं पी सी शर्मा म्हणाले आहेत. त्यांच्या या वादग्रस्त वक्यव्यामुळे त्यांच्यावर टीकांचा भडिमार सुरू आहे.

  • Share this:

भोपाळ, 16 ऑक्टोबर : मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसचे मंत्री पी सी शर्मा यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. 'वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमधील हे रस्ते कसे होते? पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत अगदी कैलास विजयवर्गीय यांच्या गालासारखे. आता 15-20 दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे चकाचक रस्ते होतील.' असं पी सी शर्मा म्हणाले आहेत. त्यांच्या या वादग्रस्त वक्यव्यामुळे त्यांच्यावर टीकांचा भडिमार सुरू आहे.

पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यावेळी पी सी शर्मा यांनी नाव न घेता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना टोला हानला आहे. 24 ऑक्टोबर 2017 रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान वॉशिंग्टन डीसीमध्ये म्हणाले होते की, 'जेव्हा वॉशिंग्टन विमानतळावर उतरलो तेव्हा तिथले रस्ते पाहिल्यानंतर मला वाटले की मध्य प्रदेशातील रस्ते अधिक चांगले आहेत' त्यावर शर्मा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

इतर बातम्या - उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतरही अभिनेत्याने दिल्या आदित्यला शुभेच्छा, VIDEO व्हायरल

याआधीही हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते व्हावेत असं बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2019 09:45 AM IST

ताज्या बातम्या