मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

दिल्लीत गेलेल्या फडणवीसांना कटोरा घेवून फिरावं लागेल, काँग्रेस मंत्र्याची सडकून टीका

दिल्लीत गेलेल्या फडणवीसांना कटोरा घेवून फिरावं लागेल, काँग्रेस मंत्र्याची सडकून टीका

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगलं काम करत आहे. आमचे आमदार खुश आहे, त्यामुळे हे सरकार पाच वर्षे चालणार आहे'

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगलं काम करत आहे. आमचे आमदार खुश आहे, त्यामुळे हे सरकार पाच वर्षे चालणार आहे'

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगलं काम करत आहे. आमचे आमदार खुश आहे, त्यामुळे हे सरकार पाच वर्षे चालणार आहे'

नागपूर,  18 जून : भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहे. त्यामुळे  मध्य प्रदेश, राजस्थानपाठोपाठ महाराष्ट्रातही 'ऑपरेशन कमळ'ची राजकीय चर्चा रंगली. परंतु, फडणवीस यांनीच ही शक्यता फेटाळून लावली. तर काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी  'फडणवीसांना राज्यात शेवटी कटोरं घेऊन फिरावं लागेल' अशी सडकून टीका केला आहे.

आज नागपूर शहर आणि ग्रामीणच्या कायदा सुव्यवस्था आणि कोविडच्या संदर्भातील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत हजर होते. या बैठकीनंतर न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना नितीन राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

अजित पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट, 'त्या' महिलेवर गुन्हा दाखल

'महाराष्ट्र सरकारचं चांगल्या स्थितीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगलं काम करत आहे. आमचे आमदार खुश आहे, त्यामुळे हे सरकार पाच वर्षे चालणार आहे. शेवटी देवेंद्र फडणवीस यांना कटोरा घेवून फिरावं लागेल' अशी सडकून टीका राऊत यांनी केली.

तसंच, 'राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून प्रयत्न सुरू होता.  भाजपनं आमदार विकत घेऊन सरकार पडण्याचं षडयंत्र रचलं होतं, पण यात त्यांना यश आलं नाही', असं भाष्य राउत यांनी केलं.

दिल्लीत फडणवीस यांनी घेतली शहांची भेट

दरम्यान,  देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. शुक्रवारी दिल्लीत दाखल झालेल्या फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या.

त्याच्यावर कोरोनाचा उपचार करू नका, वाचला तर भरचौकात फासावर लटकवा, मनसेची मागणी

अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीस करत असले तरीही या भेटीत कोरोना स्थितीसह राज्यातील राजकारणाबाबतही चर्चा झाली असल्याची माहिती आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात जवळपास 25 मिनिटे वेगळी चर्चा झाली असून यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवरही खलबतं करण्यात आल्याची माहिती आहे.

First published:

Tags: काँग्रेस, देवेंद्र फडणवीस, नितीन राऊत, भाजप