काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचं निधन. दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला.

  • Share this:

नवी दिल्ली,ता,22 ऑगस्ट : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचं आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. अस्वस्थ वाटू लगाल्यानं त्यांना नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरीमधल्या प्रायमस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच दरम्यान त्यांचं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हॉस्पिटलमध्ये जावून कामत यांना श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटरवरून कामत यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. कामत यांचा गांधी घराण्याशी निकटचा स्नेह होता. काँग्रेसपक्षाच्या बांधणीत त्यांचं मोठं योगदान आहे असंही राहुल गांधी म्हणाले. आज संध्याकाळपर्यंत त्यांचं पार्थिव मुंबईत आणलं जाणार असून उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

गुरूदास कामत हे काही कामासाठी ते मंगळवारीच नवी दिल्लीत आले होते. मुंबई काँग्रेसचे दिर्घकाळ अध्यक्षपद त्यांनी भुषवलं होतं.  1972 मध्ये त्यांनी विद्यार्थी नेते म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. गांधी घराण्याचे ते विश्वासू म्हणून ओळखले जात.

राजीव गांधींचे जवळचे मित्र होते. खासदार, केंद्रात मंत्री आणि पक्षातही विविध पदांवर त्यांनी काम केलं. मुंबईत काँग्रेस वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 1987 मध्ये त्यांनी महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद भुषवलं होतं. 2014 मध्ये पराभव झाल्यानंतर पक्षात ते काही एकाकी पडले होते. राजस्थानचा प्रभार त्यांच्याकडे होता.

पक्षश्रेष्ठींशी मतभेदानंतर त्यांनी ते पदही सोडलं होतं. संजय निरूपम यांच्याकडे मुंबईचं प्रदेशाध्यक्षपद गेल्यानंतर ते नाराज झाले होते. गुरूदास कामत यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

 --------------------------------------------------------------------------------------------------

'Post Office'ची नवी सुविधा, 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार बक्कळ पैसे

First published: August 22, 2018, 9:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading