फडणवीसांचे सर्वच अंदाज चुकत आहेत असं सांगत बाळासाहेब थोरातांनी दिली नवी IDEA

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे.

  • Share this:

साहेबराव कोकणे, 11 जानेवारी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. 'सहा महिन्यात सरकार कोसळणार, भाजपच्या 220 जागा येणार, विरोधीपक्ष नेता करता येईल एव्हढ्या पण जागा विरोधकांना मिळणार नाही, असं भाकित करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे सर्व अंदाज खोटे ठरत आहेत. आता त्यांनी चांगला ज्योतिष शोधावा,' असा बोचरा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

'आरोप करायचा पिंड हा अनेक वर्षे विरोधातच राहिलेल्या भाजपचा राहिला आहे. आता पुन्हा ते विरोधात बसल्याने आम्ही केलेल्या चांगल्या कर्जमाफीला विरोध करत आहेत. विदर्भातील शेतकरी आत्महत्या ही नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे. आमच्या काळात त्या कमी झाल्या होत्या. पण मध्यंतरी त्यात पुन्हा वाढ झाली आहे,' असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

नगर जिल्ह्यात कमबॅक करण्यासाठी भाजपचा नवा प्लॅन

'सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार'

'महाविकास आघाडी कर्जमाफी आदी योजना राबवून विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे,' असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी भविष्यात शेतकऱ्यांसाठी आणखी काही योजना राबवण्याबाबतचे संकेत दिले आहेत. यावेळी त्यांनी कर्जमाफीवरून विरोधकांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचारही घेतला.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून 'या' नावावर शिक्कामोर्तब!

'मी नाराज नाही'

बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद नाकारल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चेनं वेग पकडला होता. मात्र थोरात यांनी या चर्चा खोडून काढल्या आहेत. 'पालकमंत्रिपद मी स्वतः नाकारले. मी नाराज नाही. इतरांना संधी मिळावी यासाठी पद नाकारलं. तीन पक्ष एकत्र असल्याने सर्वांना संधी देणे अवघड होतं. मात्र यापुढे सर्वांना सोबत घेऊन यशस्वीपणे सरकार चालवणार,' अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2020 02:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading