गाडीमुळे गावकऱ्यांच्या अंगावर उडाला चिखल, काँग्रेस नेत्याला नाक घासून मागायला लावली माफी

या नेत्यानं अशी काही चूक केली की गावकऱ्यांनी त्यांना जाहीर माफी मागण्यासाठी भाग पाडलं.

  • Share this:

एका काँग्रेस नेत्याला काही नागरिकांची नाक घासून माफी मागण्याची वेळ आली. या नेत्यानं अशी काही चूक केली की गावकऱ्यांनी त्यांना जाहीर माफी मागण्यासाठी भाग पाडलं.

काँग्रेस नेता आणि माजी जिल्हाप्रमुख भगवतीलाल रोत एका सभेसाठी चालले होते. तेव्हा त्यांच्याकडून एक चूक झाली आणि त्याची माफी मागण्यासाठी काँग्रेसच्या या नेत्याने गावकऱ्यांसमोर नाक घासलं.

ते झालं असं की, सभेला जाताना त्यांच्या गाडीमुळे रस्त्यावरील लोकांच्या अंगावर चिखल उडाला. पण त्यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिथून निघून गेले.

गावकऱ्यांना त्यांचा असा झालेला अपमान काही सहन झाला नाही आणि त्यांनी तब्बल 2 किलोमीटरपर्यंत रोत यांच्या गाडीचा पाठलाग केला.

अखेर रोत यांना गावकऱ्यांनी गाठलं आणि त्यांच्याशी भांडण करण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांचा हा रोष पाहून रोत इतके हादरले की त्यांनी चक्क नाक घासून केलेल्या कृत्याची माफी मागितली.

बरं गावकरी काही या सगळ्यावर शांत झाले नाहीत, तर त्यांनी या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ शूट केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की रोत ज्या सभेला जाणार होते त्या सभेतही हा व्हिडिओ पोहचला.

हा सगळा प्रकार राजस्थानमधल्या डूंगरपुरच्या सागवाडामध्ये घडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2018 12:07 PM IST

ताज्या बातम्या