S M L

काँग्रेस-जेडीएसच्या सर्व आमदारांचा 'या' हाॅटेलमध्ये मुक्काम

आपले आमदार फुटू नये यासाठी काँग्रेसनं त्यांच्या सर्व आमदारांना ईगल टर्न हॉटेलमध्ये ठेवलंय. सकाळपासून काँग्रेसच्या आमदारांची पावलं ईगल टन हॉटेलकडे वळू लागली.

Sachin Salve | Updated On: May 16, 2018 08:09 PM IST

काँग्रेस-जेडीएसच्या सर्व आमदारांचा 'या' हाॅटेलमध्ये मुक्काम

16 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यामुळे सत्तेचा पेच निर्माण झालाय. जेडीएस आणि काँग्रेसने युती केल्यामुळे भाजपला चांगलाच झटका बसलाय. आपले आमदार फुटू नये यासाठी काँग्रेस आणि जेडीएसने सर्व आमदारांना कर्नाटकातील प्रसिद्ध ईगल टन हाॅटेलमध्ये थांबवलंय.

ईगल टन..बंगळुरूमधलं हे प्रसिद्ध हॉटेल सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्याचं केंद्र बनलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण कर्नाटकात कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळं घोडेबाजाराची शक्यता नाकारता येत नाही.

आपले आमदार फुटू नये यासाठी काँग्रेसनं त्यांच्या सर्व आमदारांना ईगल टर्न हॉटेलमध्ये ठेवलंय. सकाळपासून काँग्रेसच्या आमदारांची पावलं ईगल टन हॉटेलकडे वळू लागली.

सकाळी काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. काँग्रेसचे 6 तर जेडीएसचे 2 आमदार गैरहजर राहिल्यानं काँग्रेस आणि जेडीएसच्या गोटात धाकधूक वाढली. मात्र उशिरा का होईना काँग्रेसचे सर्वच्या सर्व म्हणजे 78 आमदार ईगल टन हॉटेलमध्ये थांबले असल्याचं कळतंय.

दरम्यान, नाराज आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप तसंच काँग्रेस आणि जेडीएसच्या गटाकडून केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 08:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close