Home /News /news /

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा फज्जा, कार्यकर्ते नसल्याने सभाच रद्द

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा फज्जा, कार्यकर्ते नसल्याने सभाच रद्द

    पंढरपूर, 04 सप्टेंबर : 1 सप्टेंबरला कोल्हापूर येथून निघालेली काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा रात्री उशिरा पंढरपूरमध्ये दाखल झाली. यात्रेला नियोजित वेळेपेक्षा साडेतीन तास उशीर झाल्याने कार्यकर्त्या अभावी नियोजित सभा रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली. सरकारच्या विरोधात मतदारामध्ये जनजागृती आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने 1 सप्टेंबरपासून जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्याचाच पुढचा टप्पा पंढरपूर होतं. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती पण कार्यकर्तेच नसल्यानं सभा रद्द करण्याची वेळ काँग्रेसवर आली. त्यामुळे पंढरपूरच्या जनसंघर्ष यात्रेचा फज्जा उडाला असं म्हणायला हरकत नाही. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यामध्ये या यात्रेचे भ्रमण असून 7 सप्टेंबरला पुण्यात समारोप असणार आहे. या यात्रेत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, त्याचबरोबर अनेक नेतेगण सहभागी झाले आहेत. मात्र जनसंघर्ष यात्रेत नियोजनाचा अभाव असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, सांगलीत झालेल्या जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर जोरजार टीका केली. भाजप विरोधातील काँग्रेसची नावे मतदार याद्यांमधून गायब करण्यासाठी आर.एस.एस. ची फौज कामाला लागली आहे, असा हल्लाबोल अशोक चव्हाण यांनी केला. हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घ्या, असं आव्हानही त्यांनी सरकारला दिलंय. मोदी-शहा जोडी काँग्रेसला घाबरली आहे, देशात मोदी हुकुमशाही करत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली तर भीमा कोरेगाव प्रकरणाचा छडा लावला जातोय पण दाभोलकर, पानसरेंचे खुनी पकडले जात नाहीयेत. कारण पुरोगामी विचार सरकारला संपवायचा आहे, असा आरोपही त्यांनी केलाय. PHOTOS : दहीहंडी उत्सावाला आयटम साँगचा तडका !
    First published:

    Tags: BJP, Congress, Pandharpur

    पुढील बातम्या