मतदानानंतर EVM विरोधात काँग्रेसची नवी मागणी, निवडणूक आयोगाला पाठवलं पत्र!

मतमोजणीच्या वेळी स्ट्रॉंगरूमच्या आसपास इंटरनेट सुविधा बंद करावी अशी मागणीही काँगसने केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 06:03 PM IST

मतदानानंतर EVM विरोधात काँग्रेसची नवी मागणी, निवडणूक आयोगाला पाठवलं पत्र!

मुंबई, 22 ऑक्टोबर : महाराष्ट्रात सोमवारी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. यामध्ये सगळ्यात गाजला तो ईव्हीएमचा मुद्दा. आधीच ईव्हीएमवर विरोधकांची नाराजी असताना आता ईव्हीएम असणाऱ्या गोडाऊन परिसराजवळ जॅमर लावावेत अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. यासंबंधी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्रदेखील पाठवलं आहे. यासगळ्यावर आता निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

थोरात यांनी यासंदर्भात निवडणूक अधिकारी यांना पत्र पाठवलं. मतमोजणीच्या वेळी स्ट्रॉंगरूमच्या आसपास इंटरनेट सुविधा बंद करावी अशी मागणीही काँगसने केली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील मतमोजणी केंद्राबाहेर जॅमर लावण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आता काँग्रेसनेदेखील निवडणूक आयोगकडे जॅमर लावण्याची मागणी केली आहे. यावर आता निवडणूक आयोग याची दखल घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच साताऱ्यात मात्र एक धक्कादायक प्रकार घडला. घडाळ्याचं बटण दाबल्यानंतरही मत कमळाला जात असल्याचा प्रकार कोरेगाव मतदारसंघात समोर आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर विरोधकांनीही यावर जोरदार टीका केली.

'आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देण्यासाठी घडाळ्यासमोरील बटण दाबल्यानंतरही मत मात्र कमळाला जात आहे,' अशी तक्रार कोरेगाव मतदारसंघातील एका गावातील मतदारांकडून करण्यात आली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर असा प्रकार होत असल्याचं मान्य केलं. अखेर मग त्या गावातील ईव्हीएम मशीन बदलण्यात आलं आणि मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली. याबाबत 'एबीपी माझा' या मराठी वाहिनीने वृत्त दिलं होतं.

इतर बातम्या -VIDEO: मुंबई पोलिसांना जबर मारहाण, संतप्त नागरिकांनी फोडल्या गाड्या

Loading...

देशभरात गेल्या काही निवडणुकांपासून ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएमबाबत आक्षेप नोंदवला आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही ईव्हीएमवरच घेण्यात आली. मात्र आता साताऱ्यात हा प्रकार उघडकीस आल्याने ईव्हीएमच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या -बालपणाच्या मैत्रीवर अपघाताने घातला घाला, 3 मित्रांचा जागीच मृत्यू

दरम्यान, News18 Lokmat आणि IPSOS च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदात EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. या पोलनुसार, पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

इतर बातम्या -धक्कादायक! कर्नाटकातील स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन, पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...