मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राजस्थानमध्ये काँग्रेसमधील राजकीय वादळ तुर्तास शमलं, गहलोत गटाचे 'राजीनामास्त्र' म्यान

राजस्थानमध्ये काँग्रेसमधील राजकीय वादळ तुर्तास शमलं, गहलोत गटाचे 'राजीनामास्त्र' म्यान

. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला

. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला

. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Rajsamand, India
  • Published by:  sachin Salve

राजस्थान, 26 सप्टेंबर : राजस्थानमध्ये पुन्हा एकदा सत्ता संघर्षाचा पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये काँग्रेसचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. पण, रात्री अनेक घडामोडी घडल्यानंतर काँग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीपर्यंत संकट टळले आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, यानंतर लगेचच राजस्थानमध्ये काँग्रेससाठी राजकीय संकट उभं राहिलं. सचिन पायलट यांना नवे मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू झाली होती पण आमदारांनी राजीनामास्त्र उगारल्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. रविवारी रात्री वेगवान घडामोड घडल्या. काँग्रेसचे नेते दिल्लीतून लगेच राजस्थानमध्ये दाखल झाले.

('तुमच्यावर थुंकणेच काय ते बाकी ठेवले', शिवसेनेची शिंदे गटावर जळजळीत टीका)

रात्रभर विचारमंथन केल्यानंतर 19 ऑक्टोबरपर्यंत काँग्रेस विधायक दलाची बैठक होणार नाही. काँग्रेस अध्यक्षाची निवड झाल्यानंतर ही बैठक होणार आहे. तिथेच सर्व आमदार सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

('...म्हणून महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर जात आहेत', रोहित पवारांचा भाजपवर आरोप)

रविवारी संध्याकाळी अचानक अशोक गहलोत यांच्या गटातील सगळे आमदार विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्या घरी जात असल्याची माहितीही समोर आली. गहलोत गटातल्या 92 आमदारांनी राजीनाम्यावर सही केल्याचं आमदार प्रतापसिंग खाचरियावास यांनी न्यूज18 शी बोलताना सांगितलं. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर लगेच दिल्लीहून पर्यवेक्षक म्हणून मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले, त्याआधी अशोक गहलोत दोन्ही पर्यवेक्षक थांबलेल्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना भेटले. या तिन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बैठक चालली. यानंतर राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा मुख्यमंत्री निवासस्थानी आले. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही मुख्यमंत्री निवासस्थानी आले आणि त्यांच्याशी चर्चा केली. रात्रभर चर्चा केल्यानंतर गहलोत यांच्या आमदारांनी तुर्तास राजीनामास्त्र म्यान केलं आहे.

First published: