'राज्यपालांवर दबाव होता का?' कंगना प्रकरणात काँग्रेसची घणाघाती टीका

'राज्यपालांवर दबाव होता का?' कंगना प्रकरणात काँग्रेसची घणाघाती टीका

कंगना राणौतला त्यांनी तातडीने भेट दिली याचा खेद वाटतो अशा शब्दात काँग्रेस मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत राज्यपाल कोशारी यांच्यावर टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कंगना रौनात हिला दिलेल्या भेटीवरून काँग्रेस पक्षाने राज्यपालांवरच टीका केली. मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन गलिच्छ भाषेत अपमान करणाऱ्या कंगना राणावतला त्यांनी तातडीने भेट दिली याचा खेद वाटतो अशा शब्दात काँग्रेस मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत राज्यपाल कोशारी यांच्यावर टीका केली आहे.

'महामहीम राज्यपाल उत्तराखंडचे असले तरी आता ते सर्वस्वी महाराष्ट्राचे आहेत. तसेच ते संविधानाच्या दृष्टिने महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत. सर्वांनाच त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यातही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा रक्षणाची जबाबदारी राज्याचे प्रमुख राज्यपालांची असते, म्हणूनच मुंबई पोलीसांना बदनाम करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन गलिच्छ भाषेत अपमान करणाऱ्या कंगना राणावतला त्यांनी तातडीने भेट दिली याचा खेद वाटतो. महामहीमांवर दबाव होता का? हा संदेह जनतेत आहे. असो!' असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

ड्रग्ज प्रकरणात उर्मिला मातोंडकरांच्या अडचणी वाढल्या, वकिलानं बजावली नोटीस

सचिन सावंत पुढे म्हणाले की, 'जरी महामहीमांनी तिला भेट दिली तरी ज्या त्वरेने अजोय मेहतांना बोलावणे धाडले तशीच तिची कान उघाडणी केली असती तरी महाराष्ट्राच्या जनतेला आनंद झाला असता. पण महामहीम आसनस्थ होण्याआधी बसून तिने आमच्या महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही आदर राखला नाही याची खदखद आमच्या मनात व जनमानसात आहे अशी टीका सचिव सावंत यांनी केली आहे.

कोरोनाचा विळखा वाढताच या जिल्ह्याने घेतला मोठा निर्णय, आजपासून असणार कर्फ्यू

दरम्यान, अभिनेत्री कंगना रणौतने रविवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली होती. जवळपास 45 मिनिटं कंगना आणि राज्यपाल यांच्यामध्ये चर्चा झाली. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईबाबत, कंगनाने चर्चा केली. कंगना आणि राज्यपाल यांच्या बैठकीवेळी, कंगनाची बहीण रंगोलीही उपस्थित होती. 'माझ्यावर जो अन्याय झाला, त्यासंदर्भात मी राज्यपालांची भेट घेतली. मला न्याय मिळेल अशी आशा आहे. मी कोणी राजकारणी नाही, माझं म्हणणं राज्यपालांनी एका मुलीप्रमाणे ऐकून घेतलं,' अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर कंगनाने दिली होती.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 19, 2020, 9:22 AM IST

ताज्या बातम्या