Home /News /news /

कठुआ-उन्नाव प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या राज्यभरात काँग्रेसचे कँडल मार्च

कठुआ-उन्नाव प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या राज्यभरात काँग्रेसचे कँडल मार्च

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ठाणे इथं कँडल मार्चमध्ये सहभागी होणार आहेत.

मुंबई, 14 एप्रिल : जम्मू -काश्मीरमधील कठुआ बलात्कार-हत्या प्रकरण आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेल्या अमानुष बलात्काराच्या निषेधार्थ काँग्रेसकडून रविवारी सर्व जिल्हा मुख्यालयात कँडल मार्च काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ठाणे इथं कँडल मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण दुर्देवाने सरकार महिला सुरक्षेसाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून महिल आणि बालिकांवरील अत्याचारात ३६ टक्के वाढ झाली आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष रविवारी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कँडल मार्च काढणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण ठाणे इथं या कँडल मार्च मध्ये सहभागी होतील. उद्या सायंकाळी ७.०० वाजता ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोरून हा मार्च सुरू होऊन ठाणे रेल्वे स्टेशनपर्यंत जाईल.
First published:

Tags: Candel march, Congress, अशोक चव्हाण, कँडल मार्च, काँग्रेस

पुढील बातम्या