काँग्रेसच्या पराभवाचं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं 'खरं' कारण!

काँग्रेसच्या पराभवाचं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं 'खरं' कारण!

पुढील पाच वर्ष विरोधी पक्षाची जबाबदारी घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. काँग्रेस दिग्गज नेते प्रचारात आले. आमचे कार्याधयक्ष त्या विभागात प्रचार केला. दोनशेहून अधिक सभा वेगवेगळ्या नेत्यांच्या झाल्या. पण ...!

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाला अजून जागा मिळेल अशी अपेक्षा होती पण ४४ जागा मिळाल्या. जनतेचा कौल आम्हाला मान्य असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस या निवडणुकांमध्ये कुठे कमी पडली याचंही कारण थोरातांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

पुढील पाच वर्ष विरोधी पक्षाची जबाबदारी घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. काँग्रेस दिग्गज नेते प्रचारात आले. आमचे कार्याधयक्ष त्या विभागात प्रचार केला. दोनशेहून अधिक सभा वेगवेगळ्या नेत्यांच्या झाल्या. पण मुंबई काँग्रेस अंतर्गत समस्या आहेत. त्याचा परिणाम निवडणुकांच्या निकालामध्ये दिसून आला. स्थानिक पातळीवरून संघटन अधिक मजबूत करायला पाहिजे होतं असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

दरम्यान, सत्ता स्थापनेविषयीचा प्रश्न विचारला असता, शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेमं भाजप प्रभावातून बाहेर यायला हवे. त्यानंतर आम्ही दिल्लीशी बोलू असंही थोरात म्हणाले. दरम्यान शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस उत्सुक आहे अशी प्रतिक्रिया याआधीही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. सेनेची तयारी असेल तर आम्ही दिल्लीला विचारतो, इतक्या स्पष्ट शब्दांत थोरातांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे आता शिवसेना यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या - 'बाप बापचं असतो', राष्ट्रवादीने बॅनर लावून केली भाजपवर झोंबणारी टीका

महाराष्ट्राचा नवा विरोधी पक्षनेता कोण होणार? बाळासाहेब थोरात म्हणतात...

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. 'आम्हाला सत्ता स्थापन करण्याइतक्या जागा मिळवण्यात अपयश आलं आहे. मात्र समाधानकारक जागा नक्कीच मिळाल्या आहेत,' असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेना सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील कोणता नेता विधानसभेचा विरोधी पक्षनेता होणार, याची चर्चा सुरू झाली. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यावं, याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा होईल. त्यानंतर याचा निर्णय घेण्यात येईल.'

इतर बातम्या - भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरनंतर आदित्य ठाकरेंसाठी शिवसेनेचा नवा फंडा!

थोरात यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

- मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत समस्या आहे .त्याचा परिणाम दिसून आला.

- स्थानिक पातळीवरून संघटन अधिक मजबूत करायला पाहिजे.

- शिवसेनेकडून प्रस्ताव आलेला नाही

- शिवसेनेनं भाजपच्या प्रभावतून बाहेर यायला हवं. त्यानंतर आम्ही दिल्लीशी बोलू

- मनसे आणि वंचित सोबत नव्हते, पण त्यांचा नेमका किती परिणाम हे पाहिलेलं नाही.

- काश्मीर आणि कलम 370 हे राज्यात यशस्वी ठरले नाही

- महाराष्ट्रात काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचारात आले होते

- आमच्या नेत्यांनी दोनशेहून अधिक सभा वेगवेगळ्या नेत्यांच्या झाल्या आहेत

इतर बातम्या - निकालानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेला पहिला धक्का

दरम्यान, महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाला बहुमतासाठीच्या जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आता भाजप - शिवसेनेच्या वाटाघाटींमध्ये नेमकं काय ठरतंय याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. सत्तास्थापनेसाठीच्या वाटाघाटींमध्ये भाजप - शिवसेनेत कायकाय राजकीय नाट्य घडतं हेही पाहावं लागेल. उद्धव ठाकरे त्यांच्या 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनीही 15 बंडखोर आपल्या संपर्कात असल्याचं भाष्य केलं आहे. आकड्यांच्या या खेळात सत्तास्थापनेच्या 3 शक्यता आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 06:50 PM IST

ताज्या बातम्या