मोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी

मोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी

  • Share this:

नवी दिल्ली,ता.24: काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रिकेटपटू विराट कोहलीचं फिटनेसचं आव्हान स्विकारल्याचं ट्विटरवरून सांगितलं होतं. त्यावर राहुल गांधींनी पंतप्रधानांना ट्विट करत राजकीय आव्हान दिलं.

मोदीजी तुम्ही विराटचं फिटनेस चॅलेंज स्विकारलं याचा आनंद आहे, आता माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही लवकरात लवकर पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती कमी करा. किंमती कमी झाल्या नाहीत तर आम्ही देशभर निदर्शनं करू आणि किंमती कमी करायला तुम्हाला भाग पाडू असा इशाराही राहुल गांधींनी पंतप्रधानांना दिलंय.

राहुल गांधींच्या या आव्हानामुळं काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगणार आहे.

First published: May 24, 2018, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading