काँग्रेसचं वेगळं वळण : 'शिवसेना युतीतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत यावर तोडगा नाही'

काँग्रेसचं वेगळं वळण : 'शिवसेना युतीतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत यावर तोडगा नाही'

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालानंतर सध्याची स्थिती उद्भवली कारण भाजप मित्रपक्षांना विश्वासात घेत नाही, असं सांगत काँग्रेस नेते आणि नवनिर्वाचित आमदार अशोक चव्हाण यांनी शिवसेना भाजप युती तुटल्याशिवाय यावर उपाय नसल्याचं स्पष्ट करत वेगळंच वळण दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 6 नोव्हेंबर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालानंतर सध्याची स्थिती उद्भवली कारण भाजप मित्रपक्षांना विश्वासात घेत नाही, असं सांगत काँग्रेस नेते आणि नवनिर्वाचित आमदार अशोक चव्हाण यांनी शिवसेना भाजप युती तुटल्याशिवाय यावर उपाय नसल्याचं स्पष्ट करत वेगळंच वळण दिलं आहे.

एकीकडे भाजप नेते युतीचंच सरकार येईल, असा दावा करत असताना शिवसेनेकडून मात्र ठरल्याप्रमाणे झाल्याशिवाय चर्चा नाहीचा पवित्रा कायम आहे. सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आता पुढाकार कोण घेणार हा प्रश्न असताना काँग्रेसने मात्र वेगळेच संकेत दिले आहेत.

"सध्याची स्थिती उद्भवली कारण भाजप मित्रपक्षांना विश्वासात घेत नाही. शिवसेना याच कारणामुळे अस्वस्थ आहे. युतीतल्या या दोन पक्षांमध्ये तणाव आहेत. त्यामुळे बहुमत असूनही अद्याप युतीची सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही. आता जोपर्यंत शिवसेना या युतीतून बाहेर पडत नाही तोवर या परिस्थितीवर उपाय निघू शकत नाही", असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि नवनिर्वाचित आमदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

ANI शी बोलताना अशोक चव्हाण यांनी शिवसेना युतीतून बाहेर पडण्याविषयी सुचवलं. 'भाजपमुळे खूप नुकसान झालंय', असं चव्हाण म्हणाले. कुठल्याही एका पक्षाला बहुमत नाही. ही गोष्टही त्यांनी स्पष्ट केली.

वाचा - निकालानंतरची सगळ्यात मोठी बातमी, भाजप करणार उद्या सत्ता स्थापनेचा दावा!

चव्हाण यांच्या या वक्तव्यात सर्व पत्ते खुले असल्याचंच दिसतं. एकीकडे उद्या (गुरुवारी) भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेची माहिती देणार आहेत. मुनगंटीवार यांनी युतीचंच सरकार येणार, अशी ग्वाही दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून अद्याप युतीसाठीचे कुठले सकारात्मक संकेत दिले नाहीत.

काहीही झालं तरी सत्ता ही महायुतीचीच येणार असल्याचा विश्वास यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला, सत्ता स्थापनेची माहिती देण्यासाठी ते उद्या राज्यपालांनाही भेटणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे गुरुवारी सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार असल्याचं दिसत असतानाच तो कसा याविषयी अजून काही स्पष्टता नाही.

VIDEO : भाजपच्या सत्तास्थापनेच्या खेळीला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

'भाजप राज्यपालांकडे जाऊन 145 हा बहुमताचा आकडा देत असतील, तर आम्हाला खुशी आहे', असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, असंही ते या वेळी म्हणाले. राज्यातला सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरच्या रात्री संपणार आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस सत्तास्थापनेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या गुरुवारी (7 नोव्हेंबर) बोलावली आहे. त्यानंतर शिवसेनेचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपने योग्य वाटा दिला नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जायचं का असा शिवसेनेसमोर महत्त्वाचा प्रश्न आहे.

संबंधित इतर बातम्या

'शिवसेनेचा मुख्यमंत्री बसल्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाहीत'

शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीला एकनाथ खडसेंचा पाठिंबा?

शिवसेनेचा 'बाण' भात्यात.. चंद्रकांत पाटलांच्याच हस्ते होणार विठ्ठलाची महापूजा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 06:49 PM IST

ताज्या बातम्या