काँग्रेसचं अध्यक्षपद : सुशीलकुमार शिंदे वेटिंग लिस्टमध्ये, हे माजी मुख्यमंत्री हंगामी अध्यक्ष

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर आता नव्या अध्यक्षांच्या निवडीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. याआधी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होतं. पण आता या निवडीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 04:50 PM IST

काँग्रेसचं अध्यक्षपद : सुशीलकुमार शिंदे वेटिंग लिस्टमध्ये, हे माजी मुख्यमंत्री हंगामी अध्यक्ष

नवी दिल्ली, 3 जुलै : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर आता नव्या अध्यक्षांच्या निवडीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. याआधी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होतं. पण आता या निवडीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे.

एका इंग्रजी चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार जोपर्यंत नव्या अध्यक्षांच्या नावावर सहमती होत नाही तोपर्यंत मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष असतील. मोतीलाल व्होरा हे 91 वर्षांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

Loading...

याआधी सोनिया गांधींनी सुशीलकुमार शिंदेंना अध्यक्षपदासाठी फोन केल्याची बातमी होती. अध्यक्षपदाच्या यादीत सुशीलकुमार शिंदे, राजीव सातव अशी नावं होती. पण आता सुशीलकुमार शिंदे यांचं नावही वेटिंग लिस्टमध्येच गेल्याचं दिसतं आहे.

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला होता. हा राजीनामा कार्यकारिणीने तातडीने मंजूर केला नाही.

त्यांचा राजीनामा फेटाळून लावत राहुल गांधी यांना पक्षाच्या पुनर्उभारणीसाठी आवश्यक ते बदल करण्याचे सर्वाधिकार देऊ केले. पण राहुल गांधी यांची अध्यक्षपदावर राहायची इच्छा नाही. त्यामुळे आता काँग्रेसला नवा अध्यक्ष निवडावा लागणार आहे.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. दिल्लीत झालेल्या त्यांच्या बैठकीत राहुल यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती त्यांना करण्यात आल्याचं समजतं. पण गांधी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसतं. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनरुच्चार करून अध्यक्षपदी राहण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं.

=========================================================================================================

धक्कादायक! ड्रेनेजमध्ये सापडली 300 डेबिट कार्ड, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2019 04:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...