News18 Lokmat

गुजरातचं रणमैदान : काँग्रेस प्रवक्त्यांना पंतप्रधानांवर भाष्य करण्यास नेतृत्वाकडून बंदी !

मणिशंकर अय्यर यांच्या वादग्रस्त विधानामुळे तोंड पोळलेली काँग्रेस आता गुजरातमध्ये कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही, काँग्रेस प्रवक्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणतेही भाष्य करू नये, असे लेखी आदेशच काँग्रेस नेतृत्वाने काढलेत. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधांना नीच म्हटल्यानंतर मोदींनी त्याचा संबंध थेट खालच्या जातीशी जोडून थेट गुजराती अस्मितेलाच हात घातलाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 9, 2017 02:49 PM IST

गुजरातचं रणमैदान : काँग्रेस प्रवक्त्यांना पंतप्रधानांवर भाष्य करण्यास नेतृत्वाकडून बंदी !

08 डिसेंबर, गांधीनगर : मणिशंकर अय्यर यांच्या वादग्रस्त विधानामुळे तोंड पोळलेली काँग्रेस आता गुजरातमध्ये कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही, काँग्रेस प्रवक्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणतेही भाष्य करू नये, असे लेखी आदेशच काँग्रेस नेतृत्वाने काढलेत. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधांना नीच म्हटल्यानंतर मोदींनी त्याचा संबंध थेट खालच्या जातीशी जोडून थेट गुजराती अस्मितेलाच हात घातलाय. मी मागासवर्गीय असल्यानेच काँग्रेस मला नीच म्हणून हिनवतंय, याचं प्रत्युत्तर गुजराती जनतेनं मतपेटीतूनच द्यावं, असं भावनिक आवाहनच मोदींनी गुजराजी जनतेला केलंय. त्यामुळे काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेली निवडणूक वाचाळवीर नेत्यांच्या चुकांमुळे हातून जाण्याची भीती काँग्रेस नेतृत्वाला वाटतेय. म्हणूनच राहुल गांधींनी तात्काळ मणिशंकर अय्यर यांना पक्षातून निलंबितही केलं.

मोदींच्या गुजरात मॉडेलरूपी विकासाला 'गुजराती नेटीझन्स'नीच वेडा ठरवल्याने राहुल गांधींनी भाजपला विकासाच्या मुद्यावर रोज एक प्रश्न विचारून पुरतं भंडावून सोडलंय. त्यामुळे भाजपकडे ही निवडणूक जिंकण्यासाठी भावणिक मुद्यांशिवाय दुसरा मुद्दाच उरलेला नाही. म्हणूनच मोदींनी गुजरात निवडणुकीत राम मंदिर आणि गुजराती अस्मिता या दोन मुद्यांना जाणिवपूर्वक हवा देण्याचा जोरदार प्रयत्न चालवलाय. कारण मोदींना ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत जिंकावीच लागणार आहे. गुजरातमध्ये भाजप हरली तर राष्ट्रीय पातळीवर मोदी-शहांची मोठी नाचक्की होणार आहे. अशा कठिण परिस्थितीत 'गुजराती अस्मिता' हाच एकमेव मुद्दा पंतप्रधानांना ही निवडणूक जिंकून देऊ शकतो. म्हणूनच प्रचाराच्या पहिल्या टप्प्प्यात मोदींनी, ''मै गुजरात का बेटा हूँ, इस लिए से काँग्रेस मेरा द्वेष करती है, सरदार पटेलजी का भी काँग्रेसने ऐसाही द्वेष किया था,'' असं भावनिक आवाहन करून काँग्रेसला गुजरातद्वेषी ठरवण्याचा प्रयत्न चालवलाय. अशातच मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांना 'नीच किस्मका आदमी' असा शब्दप्रयोग केल्याने मोदींना आयतच कोलीत मिळालं. आणि त्यांनी पुन्हा एकदा गुजराती अस्मिता या हुकमी मुद्याला जोरदार हवी दिलीय. हाच मुद्दा काँग्रेसला गुजरातमध्ये पुन्हा हरवू शकतो. म्हणूनच राहुल गांधींनी सावधगिरी म्हणून काँग्रेसच्या सर्व पक्ष प्रवक्त्यांना कोणतंही भाष्य करण्यास बंदी घातलीय.

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी उद्या (शनिवारी) मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 9 डिसेंबरला म्हणजे उद्या 89 जागांसाठी मतदान होतंय. पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी 977 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात गुजरातमधील 19 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये कच्छच्या 6, सौराष्ट्रच्या 48 आणि दक्षिण गुजरातच्या सात जागांसाठी मतदान होईल. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 12 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यंदाची गुजरातची विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची होणार असा अंदाज आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी संपूर्ण ताकदिनिशी या निवडणुकीत उतरल्याने पंतप्रधान मोदींसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलीय.

गुजरातची रणधुमाळी - पहिला टप्पा

Loading...

पहिल्या टप्प्यासाठी मतदान- ९ डिसें.२०१७

१८२ जागांपैकी ८९ जागांसाठी मतदान

पहिल्या टप्प्यात ९७७ उमेदवार

१९ जिल्ह्यांमध्ये मतदान

कच्छ- ६

सौराष्ट्र- ४८

दक्षिण गुजरात-७

पहिल्या टप्प्यात २ कोटी १२ लाख मतदार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2017 10:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...