S M L

पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला 300 कोटी देण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध

पुण्यातल्या कात्रज आंबेगाव परिसरात २१ एकर जागेवर बाबासाहेब पुरंदरे शिवसृष्टी उभारत आहेत. सरकारनं या प्रकल्पाला मेगा प्रोजेक्ट म्हणून मान्यता देत ३०० कोटींची गुंतवणूक करायची घोषणा केलीय. पण राष्ट्रवादीसोबत काँग्रेसनेही बाबासाहेब पुरंदरेंच्या या शिवसृष्टीला कडाडून विरोध दर्शवलाय.

Chandrakant Funde | Updated On: Feb 13, 2018 08:23 PM IST

पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला 300 कोटी देण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध

13 फेब्रुवारी, पुणे : पुण्यातला बहुचर्चित मेट्रो की शिवसृष्टी हा वाद मुख्यमंत्र्यांनी सोडवला खरा पण आता याच पुण्यात शिवसृष्टीचा एक दुसराच वाद उभारलाय. मुख्यमंत्र्यांनी एकिकडे बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टीला मंजुरी दिली असतानाच तिकडे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आंबेगावातील शिवसृष्टीला 300 कोटींचा शासकीय निधी मंजूर केलाय. पुण्यातल्या कात्रज आंबेगाव परिसरात २१ एकर जागेवर बाबासाहेब पुरंदरे शिवसृष्टी उभारत आहेत. सरकारनं या प्रकल्पाला मेगा प्रोजेक्ट म्हणून मान्यता देत ३०० कोटींची गुंतवणूक करायची घोषणा केलीय. पण राष्ट्रवादीसोबत काँग्रेसनेही बाबासाहेब पुरंदरेंच्या या शिवसृष्टीला कडाडून विरोध दर्शवलाय.

छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगून माँ जिजाऊंची बदनामी करणाऱ्या पुरंदरेंच्या शिवसृष्टीला 300 कोटी मंजूर करून हे सरकार एकप्रकारे त्यांना बदनामी करण्याचं बक्षीसच देतंय का, असा खडा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला आम्ही कदापिही 300 कोटी मिळवून देऊ देणार नाही, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहू, राज्यपालांना भेटू , याविरोधात प्रसंगी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनीही बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला पैसे देण्यास विरोध दर्शवलाय. पण राष्ट्रवादीच्या या विरोधामधला विरोधाभास म्हणजे, बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टी प्रकल्पात दस्तुरखुद्द अजित पवार यांचे सख्खे मामेभाऊ जगदिश कदम हे देखील पुढाकार घेताना दिसताहेत. ते स्वतः या प्रकल्पाचे विश्वस्त आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा पुरंदरेंच्या शिवसृष्टीला असलेला हा विरोध निव्वळ राजकीय हेतुने प्रेरित असल्याचा आरोप होतोय.

दरम्यान, राज्य सरकारनं पुणे मनपाच्या शिवसृष्टीलाही आर्थिक पाठबळ दिलं आहे. चांदणी चौक परिसरातल्या ५० एकरांच्या विस्तीर्ण डोंगरावर ही शिवसृष्टी उभारली जाणार आहे. ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाई ही शिवसृष्टी साकारणार आहेत. पण चांदणी चौकातली जागा बीडीपीसाठी राखीव असल्याने तिथला शिवसृष्टीचा प्रकल्प रखडणार तर नाहीना, अशी शंका शिवप्रेमी व्यक्त करताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 08:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close