अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी काँग्रेस - राष्ट्रवादीची आज एकत्रित बैठक

अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी काँग्रेस - राष्ट्रवादीची आज एकत्रित बैठक

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची आज एकत्रित बैठक आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होतेय. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक पार पडणार आहे.

  • Share this:

6 फेब्रुवारी, मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची आज एकत्रित बैठक आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होतेय. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अधिवेशनाचे मुद्दे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणि त्यासाठी एकत्रित येण्याची चर्चाही होऊ शकते. या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सर्व जेष्ठ नेते उपस्थित राहतील.

विरोधकांची ही बैठक अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मुद्दे ठरवण्यासाठी बोलावण्यात आली असली तरी 2019 मधील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याबाबतही काही निर्णय होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

या बैठकीला राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण असे दिग्गज नेते उपस्थित राहाणार आहेत.त्यापूर्वी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक दादरच्या टिळक भवनमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

शिवसेनेनं यापुढच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे विरोधी मतांचं विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आगामी विधानसभा एकत्र लढणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय.

First published: February 6, 2018, 11:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading