मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी, पंतप्रधानांवरील 'नीच' टीका भोवली

मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी, पंतप्रधानांवरील 'नीच' टीका भोवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीच म्हणणाऱ्या मणिशंकर अय्यर यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी, मणिशंकर यांचं पक्षाचं प्राथमिक सदसत्व रद्द

  • Share this:

07 डिसेंबर, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीच म्हणणाऱ्या मणिशंकर अय्यर यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी, मणिशंकर यांचं पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व केलं रद्द, मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांना 'नीच माणून, गंदी नाली का किडा' अशा खालच्या शब्दांमध्ये हिनवलं होतं. त्यावर राहुल गांधी यांनी त्यांना तात्काळ पंतप्रधानांची जाहीर माफी मागण्याचे आदेश दिले होते. पण मणिशंकर यांनी माफी मागतानाही जर तर शब्दांचा प्रयोग केल्याने संतापलेल्या राहुल गांधी यांनी मणिशंकर यांची थेट पक्षातूनच हकालपट्टी केलीय.

याच मणिशंकर अय्यर यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना 'चहावाला' म्हणून हिनवल्याने काँग्रेसला पराभूत व्हावं लागलं होतं. तरीही मणिशंकर अय्यर यांनी गुजरात निवडणुकीत पुन्हा तीच चूक करत पंतप्रधानांना खालच्या भाषेत लक्ष केलं. पंतप्रधानांनी हा मुद्दा थेट गुजराती अस्मितेशी जोडल्याने काँग्रेस चांगलीच अडचणीत आली होती म्हणूनच तात्काळ डॅमेज कंट्रोल म्हणून काँग्रेसनं मणिशंकर यांना थेट पक्षाबाहेरचा रस्ता दाखवलाय. दरम्यान, राम मंदिराच्या सुनावणीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कपिल सिब्बल यांनाही राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकीपासून दूर राहण्याचे आदेश दिलेत. राहुल गांधींच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुजरात निवडणुकीत नक्कीच काही प्रमाणात काँग्रेसविरोधाचं वातावरण निवळण्यास मदत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 09:22 PM IST

ताज्या बातम्या